Breaking News

टाकळी ढोकेश्वर रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर!

टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर!
---------------
जिल्हा चिकित्सलयाकडे तक्रार, पं. स. सदस्या साळवे यांचा उपोषणाचा इशारा !


टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना वेळीच सेवा उपलब्ध करून देत नाहीत. लोकप्रतिनिधींना देखील अरेरावीची भाषा वापरतात त्यांच्या या गलथान कारभाराला वैतागून पारनेर पंचायत समितीच्या सदस्या सुप्रिया अमोल साळवे यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक ग्रामीण रुग्णालय अहमदनगर यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे.
      या तक्रारी मध्ये म्हटले आहे की ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथील वैदयकिय अधिकारी हे कर्तव्य कालावधीत रुग्णालयात कधीच हजर नसतात. तसेच त्यांच्या कडुन येणाऱ्या रुग्णांना कधीच तातडीचे सेवा उपलब्ध होत नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधीशी बोलणे वागणे व्यवस्थीत नसुन ते अरेरावीची भाषा वापरतात. वैद्यकीय अधिकारी हे कार्यालयात उपस्थित नसल्याने अनेक रुग्णांच्या नाराजीला लोकप्रतिनिधीना सामोरे जावे लागत आहे.
       तसेच ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित नसुन प्रत्येक कर्मचाऱ्याचे उपस्थित वेळापत्रक बोर्डवर लावण्यात यावे. ग्रामीण रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी हे वेळेवर उपस्थित राहत नसुन त्यांच्या कामाचे वेळापत्रक कोणत्याही कर्मचाऱ्याला माहित नसते, ग्रामीण रुग्णालयातील विविध उपकरणे (एक्सरे मशिन) अनेक महिने झाले अदयावत आहे पण त्याचा उपयोग रुग्णसेवेसाठी मोठ्या प्रमाणात करत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील निधीचा योग्य वापर झालेला दिसुन येत नाही. यात खुप मोठा गैरव्यवहार झाल्याचे दिसुन येते याची सखोल चौकशी व्हावी. ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथील वैदयकिय अधिकारी यांच्या सहित कर्मचारी ड्रेस कोड, आय कार्ड परिधान करीत नसल्याने रुग्ण कोण व कर्मचारी कोण हेच कळुन येत नाही. ग्रामीण रुग्णालय टाकळी ढोकेश्वर येथील वैदयकिय अधिकारी यांच्या सहित कर्मचारी कुठलाही कर्मचारी मुख्यालयी रहात नसल्याचे निर्दशनास येत आहे.
     वरील मुददयांबाबत योग्य ती प्रशासकीय कारवाई १० दिवसांत करण्यात यावी त्याचप्रमाणे त्यांच्या वागणुकीने मध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा अथवा कारवाई न झाल्यास आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा सुप्रिया साळवे यांनी यात दिला आहे.