Breaking News

माजी आमदार वैभव पिचड यांच्या सह आदिवासींचा तहसील कचेरीत ठिय्या

माजी आमदार वैभव पिचड यांच्या सह आदिवासींचा तहसील कचेरीत  ठिय्या
---------
 सडलेले धान्य भाताचा पेंढा  शासनाला दिला


अकोले /प्रतिनिधी :
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत देण्याचा निर्णय दोन दिवसात न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्याचा इशारा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी आमदार वैभवराव पिचड यांनी दिला. सडलेले कुजलेले धान्य भेट देऊन मुख्यमंत्री यांना पाठविण्याची विनंती केली व त्याची पोहच आम्हाला द्या अशी मागणी करत भाजप कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केले . 
       यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे , गिरजाजी जाधव , शिवाजी धुमाळ, भाऊसाहेब वाकचौरे,मच्छिंद्र मंडलिक यशवंत आभाळे ,राजेंद्र डावरे , सुरेश गभले सभापती सौ.उर्मिला राऊत व सर्व सदस्य उपस्थित होते . 
गेली तीन  महिन्यापासून  धान्य नाही आम्ही का पेंढा खायचा का ?असा सवाल करून , शेतातील धान्य अवकाळी पाऊसाने सडून,    गेले अद्याप पंचनामे नाहीत त्यामुळे आज सकाळी नगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या पाचनई , पेठ्याची वाडी येथील ५० ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयात येऊन माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली येऊन रेशन कार्ड , तसेच जोपर्यंत पंचनामा करत नाही तसेच रेशन दुकानदार निलंबित करून आम्हाला धन्य मिळत नाही तोपर्यंत तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही असा निर्णय घेतल्याने व पाच तास ठिय्या केल्याने  अधिकारी वर्गाची धावपळ उडाली . यावेळी नायब तहसीलदार गिरी , पुरवठा अधिकारी रावते , तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी याबाबत दोन दिवसात पेठेवाडी येथे धान्य पाठवतो , पंचनामे केले जातील  लेखी हमी दिल्याने हे आंदोलन शांत झाले . पेठेवाडी येथील सरपंच गोविंदा खुशाबा घोगरे यांनी सकाळी ५० महिला , मुले व ग्रामस्थांना सोबत घेऊन राजूर येथे माजी आमदार वैभव पिचड याना भेटून आपली कैफियत मंडळी तर श्री पिचड यांनी तातडीने सर्वाना सोबत घेऊन तहसीलदार कार्यालय गाठले . प्रसंगी सरपंच गोविंदा घोगरे व ग्रामस्थांनी गेली तीन महिन्यापासून मोदी साहेबांचे ५ किलो तांदूळ सोडले तर काहीच धान्य मिळाले नाही त्यात अस्मानी संकट आल्याने भातपीक नष्ट झाले. 
   वावरत गुडघाभर पाणी असून भात  सोडून , कुजून गेले आहे .हातात पेंढा सोडला तर काहीच नाही रेशन दुकानदार धान्य देत नाही मग आम्ही पेंढा खायचा का . ?असे म्हणत कुजलेले धान्य प्लास्टिक पिशवीत आणून ते तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देऊन मुख्यमंत्री याना पाठवून त्याची भाकरी करून खा म्हणावे म्हणजे आम्हा गरिबांना न्याय मिळेल अशी विनंती केली तर माजी आमदार वैभव पिचड यांनी गेली तीन महिन्यापूर्वी गावातील ५० लोकांनी लेखी अर्ज देऊनही त्याची दखल घेतली नाही जुलै चा अर्ज १० ऑक्टोबरला काढला व अजूनही जर तुम्ही रेशन देत नसेल तर त्या दुकानदाराचे लायसन्स रद्द करा व धान्य पोहच करा यावर नायब तहसीलदार गिरी यांनी तो अधिकार आम्हाला नाही जिल्हा पुरवठा अधिकारी याना आहे असे म्हणताच वातावरण तापले मग रतन वाडीचे लायसन्स आमदारांच्या सांगण्यावरून निलंबित होते वांजुळशेत मध्ये डाळीचा गैरव्हवहार होऊनही आमदाराचा मामा म्हणून फक्त डिपॉझिट जप्त करता एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा हे चालणार नाही . सायंकाळ नंतर सरकारी रेशन वाहतूक बंद असताना ठेकेदार आमदाराचा कार्यकर्ता म्हणून रात्री बारा वाजता वाहतूक कशी याचे उत्तरे द्या . तर नायब तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी याना संपर्क साधून श्री पिचड यांचे संभाषण करून दिले असता सदर दुकानदार निलंबित करून पेठेवाडीला धान्य वाटप करतो असे हमी दिल्याने वातावरण शांत झाले तर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करा , विमा प्रस्तावाची मुदत वाढवून द्या ,असे लेखी निवेदन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी याना देण्यात आले तसेच शेतात अवकाळी पाऊसाने सडलेले धान्य व ओंब्या नसलेले गवत देऊन हि भेट मुख्यमंत्री याना पाठवा व तसी  पोहच आम्हाला द्या असे भाजप कार्यकर्त्यानी  मागणी केली.
----------