Breaking News

स्व. विखेंच्या आत्मचरित्राचे मोदींच्याहस्ते होणार प्रकाशन

अहमदनगर/ प्रतिनिधी

दिवंगत माजी केंद्रीय मंत्री व राज्यातील मात्तबर नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’, या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हर्चुअल पद्धतीने येत्या दि. 13 ऑक्टोबररोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

स्व. विखे यांचे पुत्र व राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी प्रवरानगर येथील डॉ़ धनंजय गाडगीळ सभागृहात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. आपल्या वडिलांनी 1962 पासूनचा त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीचा ऐतिहासिक दस्ताऐवज या आत्मचरित्रात मांडला आहे. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांवर रोखठोक भूमिका देखील त्यांनी या पुस्तकात मांडली आहे. त्यांच्या हयातीत या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांच्या आजारपणामुळे ते शक्य झाले नाही. आता स्वत: पंतप्रधान पुस्तकाचे प्रकाशन करणार असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी सांगितले.