Breaking News

कोणतीही पूर्वसूचना न देता हटवले अतिक्रमण ग्रामविकास अधिकारी म्हणतात आम्ही काढली नाही अतिक्रमणे.

कोणतीही पूर्वसूचना न देता हटवले अतिक्रमण ग्रामविकास अधिकारी म्हणतात आम्ही काढली नाही अतिक्रमणे.
----------------
जवळ यातील अतिक्रमणे काढले कोणी याबाबत संभ्रमावस्था;हातावरच्या पोटाचा संसारही आला उघड्यावर.
---------------
जवळ्यात कोरोना काळातही कोणी भरवली ग्रामसभा.


पारनेर प्रतिनिधी :
 जवळे ता पारनेर येथे दोन दिवसांपूर्वी गावातील  गट नं १८३६ मधील अतिक्रमणे हटविण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामस्थ यांनी गावात बैठक घेत गावातील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेण्यात आला यात गावातील सगळी अतिक्रमणे हटविण्याची मागणी काही ग्रामस्थानि केली ,
परंतु कार्यवाही करताना ठराविक चार ते पाचच लोकांचीच खरी अतिक्रमणे काढण्यात आली  व बाकीच्यांना मुदत देण्यात आली काही प्रामाणिक लोकांनी आपापली सुमारेपंधरा वीस वर्षापासूनची अतिक्रमण स्वतः काढून घेतली  परंतु गावातील काही प्रतिष्ठित पुढाऱ्यांशी हितसंबंधित असलेल्या अतिक्रमण धारकांना मात्र अभय देण्यात आले त्यांच्यावर कारवाई झाली नाही व त्यांनी आज तागायत अतिक्रमणे काढली नाहीत मग त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल अतिक्रमण पीडित यांच्याकडून केला जात आहे कारण अतिक्रमण काढताना ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही लेखी पुर्व सूचना न देता कारवाईचा बडगा उगरात देखावा करत नुसता फार्स केला व याबाबतीत पुढील होऊ घातलेल्या ग्रामपंचयत निवडणुकीची गणिते लक्षात घेऊन फक्त गरिबांची अतिक्रमणे काढली की जे अन्यायाविरुद्ध कुणि आवाज उठवणार नाहीत  अशी गावात चौकात कुजबुज सुरू आहे, अचानक,अतिक्रमण हटवल्याने रोजी रोटीचा व मुलाबांळासह निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने  व्यथित झालेल्या सौ शीला बाबाजी वागदरे  यांनि मा तहसीलदार यांचेकडे तक्रार अर्ज दिला आहे.

 जवळा येथे ग्रामस्थांनी  अतिक्रमण काढण्यासाठी बैठक बोलवली होती त्यानंतर अतिक्रमणे ग्रामस्थांच्या दबावापोटी काढले आहेत  बैठक ही अनधिकृत घेण्यात आली ग्रामस्थांनी यावेळी अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी केली तसेच त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेतला मात्र अतिक्रमणधारकांना कायदेशीर पद्धतीने नोटिसा दिल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे आम्ही अतिक्रमण काढले नाहीत 
----------------
शिवाजी खामकर
 ग्रामविकास अधिकारी जवळे