Breaking News

अवैध दारूसाठा जप्त ; शिर्डी पोलिसांची कार्यवाई !

अवैध दारूसाठा जप्त ; शिर्डी पोलिसांची कार्यवाई !


शिर्डी/प्रतिनिधी :
     कोपरगाव तालुक्यातील दे. ते पोहेगाव रोडला लगत शिर्डी पोलिसांच्या कार्यवाहीत एक टाटा इंडिका कार सह शिर्डी पोलिसांनी ६४ हजार ९९२ रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.एका हप्त्यात हि दुसरी पोलीस कारवाई आहे.त्यामुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
       कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव देर्डे रोडला काही इसम अवैध दारू वाहतूक करत असल्याची गुप्त बातमी शिर्डी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली .त्यांनी या परिसरात सापळा लावला. ते त्या ठिकाणी वाट पाहत असताना त्यांना त्या ठिकाणी मिळालेल्या माहिती प्रमाणे बरोबर एक पांढऱ्या रंगाच्या (एम.एच.१७ व्ही.३३०४) या टाटा कंपनीच्या इंडिका कार दिसून आली .त्या मधून आरोपी गणेश जालिंदर चव्हाण (वय-२७) रा.बेट ता.कोपरगाव या आरोपीं अवैध दारू वाहतुक करताना मिळून आला .हि घटना बुधवारी रात्री १०.३० वाजता पोहेगाव ते देर्डे या रोड वर घडून आली .त्यात पोलिसांनी ४ हजार ९९२ रूपये किंमतीच्या १८० मि.ली.च्या ९६ बाटल्या हस्तगत केल्या .एकूण ६० हजार रूपये किंमतीची गाडी व ४ हजार ९९२ रुपयांची दारू असा एकूण ६ हजार ४९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .
    या प्रकरणी तपासणीत  ४ हजार ९९२ रुपयांची दारू मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा क्रं.६९२२०२० दारू बंदी कायदा कलम ६५ (अ) अन्वये दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारीसंजय सातव व पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे,हे.कॉ.बबन माघाडे,पोलीस नाईक बाबुराव गोडे,पो.कॉ.कैलास राठोड यांच्या पथकाने धाड टाकत जप्त केला आहे.असून सदर घटनेचा तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे शिर्डी पोलिसठाण्याचे कर्मचारी हे करीत आहेत.