Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज फक्त १७ कोरोना रुग्णाची वाढ तर एक मृत्यू

कोपरगाव तालुक्यात आज फक्त १७ कोरोना रुग्णाची वाढ तर एक मृत्यू


कोपरगाव शहर प्रतिनिधी-
 आज दिनांक ९ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २९८ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८ बाधित तर २९०अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात७२ तर खाजगी लॅब च्या अहवालात २ कोरोना बाधित आढळून आले  आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

टाकळी फाटा-२
इंदिरा नगर-१
ओम नगर-१
अंबिका नगर-१
गांधीनगर-१
सराफ बाजार-१
मोहिनी राज नगर-१
महादेवनगर-१
दत्त नगर-२


तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

रवंदे-२
सुरेगाव-३
तीळवणी-१

असे आज ९ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १७ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

आज रोजी एकूण १८ स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २१ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९८६ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८३ झाली आहे.

आज रोजी कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून त्यामुळे आज पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३६ झाली आहे.