Breaking News

धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीतील आठ जण ताब्यात

धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीतील आठ जण ताब्यात
--------------
सराईत दरोडा करणारे गुन्हेगारांची टोळी केली गजाआड
पारनेर पोलीसांची कामगिरी


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील धोत्रे येथे एका महिला लेबर कॉन्ट्रॅक्टर ला सात ते आठ जणांनी चाकूचा धाक दाखवत दोन लाख तीन हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली त्यांना विरोध केला असता दोघांना काठीने बेदम मारहाण केली याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना  7 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने ठोठावली आहे दोघे जण अद्याप फरार आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 
दि 2 रोजी सायंकाळी 06:30 वा ते 07:30 वा सु नगर-कल्याण रोडवर धोत्रे ता पारनेर जि.अहमदनगर येथील
हॉटेल अभिषेक जवळ फिर्यादी व साक्षीदार यांना 8 ते 9 लुटारु यांनी कट करुन मारहाण करुन त्यांचेकडुन 2,03,000/ -रु चा ऐवज लुटला. त्यात सोन्याचे दागिने, 4 मोबाईल व रोख रक्कम असल्याबाबत फिर्यादी सौ चंद्रकला गोपाल गवळी रा माळेगांव ता सिन्नर जि नाशिक यांचे फिर्यादीवरुन पारनेर पोलीस स्टेशनला गु.र.नं 976/2020 भा द वि कलम 395,397,120 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे तपासात पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पारनेर पो.स्टे.चे प्रभारी सपोनि राजेश गवळी व पथक यांनी अतिशय वेगवान पद्धतीने तपासाची चक्रे फिरवुन मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे गुन्हा करुन आरोपी फरार होण्याचे तयारीत असतांना अत्यंत शिताफीने गुन्हयातील आरोपी हेमंत बडोद भोसले वय 33 वर्षे, रा बुरडगांव, अहमदनगर,ज्ञानेश्वर अरुण चव्हाण वय 32 वर्षे, रा सदर,राहुल अरुण चव्हाण वय 30 वर्षे रा सदर,संजय हतन्या भोसले वय 35 वर्षे रा सदर,अक्षय उंब-या काळे वय 22 वर्षे रा सुरेगांव ता श्रीगोंदा जि अ.नगर,किसन मानकु नायकवाडी वय 45 वर्षे रा धोत्रे (खु) ता पारनेर, अ.नगर पोपट धोंडिबा तागड वय 32 वर्षे, रा सदर,अशोक मारुती गांगुर्डे वय 49 रा सदर यांना धोत्रे परिसर व अहमदनगर परिसरातुन ताब्यात घेतले व विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.त्यांना विश्वासात घेउन सखोल चौकशी केली असता यातील आरोपी यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे फरार साथीदारांचे मदतीने केल्याचे कबुल केले आहे गुन्हयातील गेला माल आणि फरार आरोपींचा शोध घेउन पुढील तपास सपोनि प्रमोद वाघ करीत आहेत.
या आरोपींवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींचा तपास लावण्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल दिवटे शिंदे साळवे गवळी साठे मोरे गावडे शिंदे यांची महत्त्वाची भूमिका राहिली.
दरम्यान महिला कॉन्टॅक्टर या स्वस्तात सोने घेण्यासाठी येथे आल्या होत्या व त्यांना स्वस्तात सोने घ्यायचे असू शकते मात्र त्यांची फसवणूक झाली व या टोळीने त्यांच्याकडील रोख रक्कम व सोने घेऊन पसार झाले मात्र महिलेने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दरोडा व चोरीचा गुन्हा दाखल केला मात्र हा प्रकार स्वस्तात सोने खरेदी करण्याच्या नादात फसवणूक झाली असल्याची चर्चा परिसरात होत आहे याबाबत पोलिस तपास नंतर सर्व गोष्टी उघड होतील.