Breaking News

पारनेर तालुक्यातील काल ११ अहवाल पॉझिटिव्ह !

पारनेर तालुक्यातील काल ११ अहवाल पॉझिटिव्ह !


पारनेर प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील कोरोना चाचणी च्या अहवालानुसार काल दि. १६ रोजी तालुक्यातील ११ अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत.
पारनेर तालुक्यातील पॉझिटिव्ह अहवालामध्ये रांधे ४ ढोकी १ पारनेर शहर ३ देवीभोयरे २ निघोज १ या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यांमध्ये कमी होताना दिसत आहे मात्र तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच नवरात्र  उत्सवा ला आजपासून  सुरुवात आहे  व काही दिवसानंतर दसरा दिवाळी सण असल्याने रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता आहे अनावश्यक बाहेर पडू नये व घराबाहेर पडताना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे.