Breaking News

चौंडी येथे तोल जाऊन चुलता-पुतण्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

चौंडी येथे तोल जाऊन चुलता-पुतण्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू


जामखेड/प्रतिनिधी :
तालुक्यातील चौंडी येथील सिना नदीवर मंगळवारी सायं मासे पकडण्यासाठी गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे वय २२ आणि सतीश बुवाजी सोनवणे वय ४३ हे चुलता पुतणे गेले होते. तोल जाऊन ते पुराच्या पाण्यात बुडाल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील या दोन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थितीचा आढावा घेतला , पाण्याचा वेग आणि अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते. बुधवार रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास या दोन्ही चुलता पुतणे यांचे मृतदेह हाती लागले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत.