Breaking News

तोतया मालक दाखवून हंगा येथील जमीनीची विक्री सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

तोतया मालक दाखवून हंगा येथील जमीनीची विक्री सात जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील हंगा येथील दोन हेक्टर ४० आर जमीन तोतया मालक दाखवून विक्री केली याप्रकरणी चंद्रकांत विठ्ठल कामठे वय ६६ वर्ष धंदा सेंट्रींग व्यवसाय राहणार श्रमसाफल्य निवास गणेश मंदिराजवळ भोलेनाथ चौक कोंढवा बुद्रुक तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जनांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २३जुलै रोजी दुय्यम निबंधक कार्यालय पारनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे चंद्रकांत विठ्ठल कामठे यांची हंगा येथील गट नंबर पाचशे वीस मधील दोन हेक्टर चाळीस आर जमीन ही फिर्यादीचे संमतीशिवाय ऐवजी कोणीतरी बनावट इसम  उभा राहून फिर्यादीचे नावाचे फोटो असलेले बनावट आधार कार्ड पॅन कार्ड तयार करून फिर्यादीचे मालकीची जमीन ही बनावट इसमाने प्रीतम दिलीप लाल पिपाडा व प्रशांत दिलीप पोवाडा दोघे राहणार सुपा तालुका पारनेर यांना विक्री केली व सदर खरेदी खतास मान्यता देणारे  अर्पणा आनंदा शेजवळ राहणार एकता नगर चाकण हल्ली राहणार हंगा तालुका पारनेर या तर  तिच्या ऐवजी उभे राहिले या तोतया इसमास ओळखतो म्हणून संदीप अशोक पुरोहित राहणार सुपा तालुका पारनेर अमोल राजेंद्र पाटील राहणार रांजणगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे व भाऊसाहेब नाना थोरात राहणार मुंगशी तालुका पारनेर यांनी व्यक्तीच्या सह्या करून फिर्यादीचे मालकीची शेतजमीन ही संगनमताने परस्पर विक्री करून फसवणूक केलेली आहे. याप्रकरणी मूळ मालक कामठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि.१५ रोजी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.