Breaking News

शेतात पाळी घालण्यासाठी कधी येणार आहे असे विचारल्याने दोघांनी केली तिघांना मारहाण.

शेतात पाळी घालण्यासाठी कधी येणार आहे असे विचारल्याने दोघांनी केली तिघांना मारहाण.


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील हातळखिंडी येथे तुमचे बैल शेतामध्ये पाळी घालण्यासाठी कधी येणार आहेत असे विचारल्याने याचा राग आल्याने दोघांनी पती पत्नीला बेदम मारहाण केली याबाबतची फिर्याद त्यांच्या मुलाने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार  संपत साहेबराव गायकवाड वय 38 वर्ष धंदा शेती रा. हाताळखिंडी   ता पारनेर जि अहमदनगर यांनी आरोपी कमलाबाई देवराम शेळके रभाजी देवराम शेळके दोघे राहणार हातळखिंडी ता पारनेर जि अहमदनगर यांना तुमचे बैल शेतात पाळी घालण्याकरिता कधी येणार आहे असे विचारल्यावर राग आल्याने व त्या फिर्यादीचे आईला मारहाण करू लागल्याने फिर्यादी व फिर्यादीचा मित्र संतोष शेळके असे भांडण मिट वित असताना रभाजी देवराम शेळके याने पीव्हीसी पाईप घेऊन येऊन फिर्यादीचे आई-वडिलांना पाइपने तसेच विटाने मारहाण करून फिर्यादीची डोक्यात देखील विटांनी मारून जखमी केले संपत गायकवाड यांनी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल शेलार करत आहे.