Breaking News

पारनेर तालुक्यात काल १५ अहवाल पॉझिटिव्ह,

पारनेर तालुक्यात काल १५ अहवाल पॉझिटिव.
-----------
पारनेर तालुक्याने पार केली २००० कोरोना रुग्णांची संख्या.
------------
देवीभोयरे व सुपा येथे वाढत आहे कोरोना रुग्ण!


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यांमध्ये काल दि.२२ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणीच्या अहवालानुसार १५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तालुक्यात सध्या रुग्ण संख्या मंदावली असली तरी एकूण रुग्ण संख्या २००० पार झाली आहे.
तालुक्यात अद्याप पर्यंत २०६८ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली आहे त्यापैकी ३४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर १९४९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे सध्या तालुक्यातील फक्त ८५ व्यक्ती उपचार घेत आहेत.
पारनेर तालुक्यांमध्ये प्राप्त झालेल्या पॉझिटिव अहवालामध्ये देवीभोयरे ५ सुपा ४ रुई छत्रपती २ हंगा १ भाळवणी १ रांधे १ पळवे खुर्द १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव अहवालामध्ये समावेश आहे.
तालुक्यातील देवीभोयरे व सुपा येथे कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे त्यात देवीभोयरे येथे दि. २१ रोजी ४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या होत्या त्यानंतर २२ रोजी ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे त्यामुळे या गावांमध्ये वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय होत आहे तेथील स्थानिक व्यवस्थापनाने याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.