Breaking News

जितेश सरडे सारख्या वैचारिक तरुणांनी समाजात चांगले काम उभे करावे : लंके


जितेश सरडे सारख्या वैचारिक तरुणांनी समाजात चांगले काम उभे करावे : लंके
--------------
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जितेश सरडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


पारनेर/प्रतिनिधी :
     विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि. २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या माहीती तंत्रज्ञान विभाग प्रमुख महाराष्ट्र प्रदेश जितेश सरडे यांच्या देविभोयरे फाटा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमात बोलताना निलेश लंके म्हणाले की जितेश सरडे सारख्या वैचारिक बैठक असलेल्या तरुणांनी राजकारणात येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावेत या जनसंपर्ककार्याल्या च्या माध्यमातून अनेक सर्व सामान्य जनतेची कामे भविष्य काळात मार्गी लागतील. असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला.


 तसेच जितेश सरडे म्हणाले की राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्य कार्यकारिणी मध्ये पारनेर तालुक्याला माझ्या पदाच्या रुपाने प्रथमच मिळालेल्या संधीचा विद्यार्थीच्या व तालुक्याच्या दृष्टीने कसा उपयोग करता येईल या विचारातून या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. माझ्या घरात आतापर्यंत साधा कोणी ग्रामपंचायत सदस्य ही झाला नाही पण आमदार निलेश लंके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला हा विश्वास अनेक सर्व सामान्य कार्यकर्त्यांना मध्ये बळ देणारा आहे.  या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री अशोक सावंत, माजी सभापती सुदाम पवार, बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड,  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष सोमनाथ वरखडे, सरपंच राहुल झावरे, नगरसेवक नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, सहदेव औटी,  सरपंच किरण पानमंद, अरूण पवार, शंकर पठारे, गणेश साठे, सुभाष मावळे, निलेश लंके प्रतिष्ठान युवक अध्यक्ष विजय औटी, अनिल गंधाक्ते, सतिश भालेकर, पोटघन मेजर, कुंडलिक पठारे, सुधीर लाकूडझोडे, भाऊसाहेब चौरे, संदीप चौधरी, आरती ढोरमले, कांतीलाल भोसले, किरण कारखिले , बाळासाहेब लंके, दत्ता आवारी, अंकुश ठोकळ  पोपट गुंड, गणेश पवार, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष ॠतिक पठारे, जेष्ठ नेते शिवाजी जाधव, विठ्ठल सरडे, सुभाष बेलोटे, अशोक मुळे, संपतराव वाळुंज विकास सावंत,प्रवीण गायकवाड, तुकाराम बेलोटे यांच्यासह मोठ्या संख्येने अनेक मान्यवर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.