Breaking News

पारनेर येथे दिवसा ढवळ्या आढळला बिबट्या नागरिकांमध्ये घबराट.

पारनेर येथे दिवसा ढवळ्या आढळला बिबट्या नागरिकांमध्ये घबराट.
-------------------
वडनेर हवेली येथेदेखील बिबट्याने काही दिवसांपूर्वी वासरु व शेळीचा पाडला फडशा.


पारनेर प्रतिनिधी :
पारनेर येथील संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये बिबट्या दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे दिवसाढवळ्या या परिसरात बिबट्या वावरत असल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे वनविभागाच्या अधिकाऱ्याला येथील नागरिकांनी याबाबत कळवले त्यानंतर कर्मचार्‍यांनी परिसरात जात पाहणी केली मात्र बिबट्या दाट झाडीचा आश्रय घेऊन पसार झाला.
पारनेर शहराच्या नजीक असलेले संमेश्वर मंदिर व पाटाडी वस्ती परिसरांमध्ये दि.२४ रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास गणेश चेडे या तरुणाने बिबट्याला पाहिले बिबट्या दूरवर असल्याने या तरुणाने त्वरित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळवले मात्र बिबट्या परिसरात असणाऱ्या झाडीमध्ये गेला त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी जगन्नाथ बोरूडे तेथे आले त्यांनी या भागाची पाहणी केली तेथे बिबट्याच्या पावलांचे ठसे या कर्मचाऱ्यांना मिळाले त्यावरून तो बिबट्या असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले दाट झाडीमध्ये लपून बसला असून येथील नागरिकांनी पिंजरा लावावा अशी मागणी केली यावेळी वनरक्षक अश्विनी सोळुंके यांनी उद्या या परिसरामध्ये पाहणी करून बिबट्या सोबत त्याचे पिल्ले नसले तर पिंजरा लावण्यात येईल असे सांगितले मात्र पिल्ले असल्यास पिंजरा लावण्यात अडचणी येतात जर पिंजऱ्यात पिल्ले आधी गेले तर तो बिबट्या परिसरात नागरिकांवर हल्ला करू शकतो असे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे पिंजरा लावण्याबाबत पाहणी करूनच निर्णय घेतला जाणार आहे.
पाटाडे वस्ती येथे ही दोन महिन्यापूर्वी बिबट्या शेतामध्ये आढळला होता त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी तेथे जात फटाके वाजवल्याने बिबट्याने तिथून धूम ठोकली होती मात्र पुन्हा जवळच असणाऱ्या संगमेश्वर मंदिर परिसरामध्ये बिबट्या आढळला आहे.
दरम्यान वडनेर हवेली येथेदेखील बिबट्याने धुमाकूळ घातला असून १५ दिवसांपूर्वी येथे सचिन बढे यांच्या वासरा वर बिबट्याने हल्ला केला त्यानंतर पुन्हा ८ दिवसांच्या अंतराने नामदेव भालेकर यांच्या शेळी वर हल्ला करत फडशा पाडला या परिसरामध्ये बिबट्याचा वावर अनेक दिवसापासून असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे नागरिकांनी वन विभागाने त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे. वडनेर हवेली येथे अनेक वेळा बिबट्या ग्रामस्थांनी पाहिला असल्याची माहिती आहे तसेच बिबट्या सोबत लहान बछडे असण्याची शक्यता आहे.
मुंगशी येथेही एक महिन्यापूर्वी बिबट्याने रात्री झोपत असलेल्या एका तरुणावर हल्ला केला होता यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला होता त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी या परिसरामध्ये पाहणी केली मात्र बिबट्या याच परिसरामध्ये अजूनही असल्याने मुंगशी आणि वडनेर त्यानंतर आता पारनेर शहर येथे हा प्रकार घडल्याने बिबट्याचा वावर या परिसरामध्ये आहे हे स्पष्ट होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.