Breaking News

शेतकर्‍यांच्या कांद्याचे दर पडणार

 - पंतप्रधान दलाल आहेत का?: कांदा आयातीवरुन राजू शेट्टी आक्रमक


मुंबई/विशेष प्रतिनिधी

देशातील व खास करून महाराष्ट्रातील कांद्याला चांगला दर मिळत असताना व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हातात दोन पैसे खुळखुळत असताना केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी असल्याने सरकारवर शेतकर्‍यांचा आधीच रोष असताना आता देशाबाहेरच्या कांदा उत्पादकांना देशात पायघड्या घातल्या जात आहेत. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून, कांदा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.