Breaking News

तालुक्यात १८ रुग्णाची भर तर २२ कोरोना मुक्त !

तालुक्यात १८ रुग्णाची भर तर २२ कोरोना मुक्त


कोपरगाव शहर प्रतिनिधी-
आज दिनांक ६ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १४४  रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १४ बाधित तर १३० अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात २ तर खाजगी लॅब च्या अहवालात २ कोरोना बाधित आढळून आले  आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

धारण गाव रोड-१
खडकी-१
रचना पार्क-१
गुलमोहोर कॉलनी-२
संभाजी चौक-१

तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

वारी-२
मंजूर-३
मळेगाव-१
येसगाव-२
पोहेगाव-१
माहेगाव देशमुख-२
कोळपेवाडी-१

आज रोजी एकूण २९ स्राव पुढील तपासणी साठी नगर येथे पाठविली आहे.

असे आज ६ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण १८ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.

   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.

आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १९३८ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ८३ झाली आहे.

आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.