Breaking News

कोरोनावरील लस डिसेंबपर्यंत!

- भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात


पुणे/ प्रतिनिधी

’कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लसच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. लशीचे 10 कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिटयूटने लसच्या उत्पादनासाठी करार केला आहे. लसच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. या लसने कोव्हिड- 19 विषाणू विरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार होते, हेही स्पष्ट झाले आहे. या लसच्या किमतीबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. मात्र, लसचा काही खर्च सरकार उचलण्याची शक्यता असल्याने लस फार महाग असणार नाही, असे त्यांनी सांगितले. कोविशिल्ड, कोव्होव्हॅक्स, कोव्हीव्हॅक्स, कोव्ही-व्हॅक, एसआयआय-कोव्हॅक्स या पाच कोव्हिड  लस दर तीन महिन्यांना एक याप्रमाणे 2021  या वर्षात बाजारात आणणार आहोत, असेही ते म्हणाले. या लसचे 10 कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत आमच्या चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लसबाबत अधिकृतपणे जाहीर होईल. त्यावरच सगळे अवलंबून आहे, असे पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे.

-----------------------