Breaking News

कांद्याने गाठली शंभरी;नवीन लागवडीसाठी तयार केलेली रोपे पावसाने गेली,बियाण्यांचा तुटवडा.

कांद्याने गाठली शंभरी;नवीन लागवडीसाठी तयार केलेली रोपे पावसाने गेली,बियाण्यांचा तुटवडा.
-----------------
कृषी सेवा केंद्रा कडून बियाणे व औषधांमध्ये होत आहे शेतकऱ्यांची लूट;स्थानिक अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
-----------------
शासनाने कांद्याचे बी शेतकऱ्यांना रास्त दरात उपलब्ध करून द्यावे शरद गोरे यांची मागणी.


शशिकांत भालेकर/पारनेर - पारनेर तालुक्यातील अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रामुख्याने यामध्ये कांद्याचे रोपे पूर्णपणे खराब झाले आहे कांद्याच्या भावात होणारी वाढ व दुसरीकडे रोपे खराब झाल्याने लागवडीवर मर्यादा आल्या आहेत तसेच मार्केटमध्ये कांदा बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे जे बियाणे मिळत आहे ते चढ्या भावाने दुकानदार शेतकऱ्यांना विकत आहे  शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे याकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.काही विक्रेत्यांनी खुले बियाणे विक्री केली. त्याची पावती न दिल्याचा प्रकार आहे. काही विक्रेते नोंदणीकृत असून मग खुले बियाणे कसे विकतात तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रा मध्ये अनिमित साठेबाजी औषधांच्या आवाजावी किंमती बनावट कंपनीचे औषधे यासाठी कृषी विभागाने बनावट विक्रेते शोधण्याची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.


तालुक्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून संततधार पाऊस तसेच काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे असे असताना तालुक्यामध्ये कांदा उत्पादन शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याचे रोप टाकले होते मात्र पावसामुळे ९०% रोप खराब झाले आहेत अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा बियाणे विकत घेऊन रोपे टाकले दिवसेंदिवस कांद्याचे बाजारभाव वाढत असल्याने कांद्याच्या बियाण्यामध्ये तुटवडा निर्माण झाला असल्याचे कृषी सेवा केंद्र चालकांकडून सांगण्यात येत आहे मात्र हेच कृषी सेवाचालक चढ्या भावाने कांदा बी काही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत मात्र यामध्ये शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होत आहे यावर स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे जे दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाळ्यामुळे खराब हवामानाचा फटका शेतकऱ्याच्या शेतमालाला बसत आहे याचा तालुक्यातील काही कृषिसेवा केंद्र चालक फायदा उचलत असून बनावट कंपनीचे औषधे शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार होत आहे तसेच काही औषधे ज्यादा दराने शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे त्यातून रोगाला आळा बसत नाही त्यामुळे शेतकरी वारंवार कृषी सेवा केंद्रावर हेलपाटे मारत आहे मात्र हे कृषी सेवा संचालक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करतात बऱ्याच शेतकऱ्यांना कोणत्या पिकावर काय औषध मारायचे याबाबत माहिती नसल्याने कृषी सेवा केंद्र चालक सांगेल ती औषधे घेतात शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा हे कृषी सेवा केंद्र चालक उचलताना दिसत आहेत.शेतकऱ्यांना भरमसाठ दरांमध्ये इतरही औषध कृषी सेवा केंद्र कडून विकली जात आहेत अनेक कृषी सेवा केंद्रात बोगस कंपन्या चे कीटकनाशके व इतर औषधे आढळून येतात  मात्र त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही त्यामुळे अशा कृषी सेवा केंद्रावर त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी शेतकरी व्यक्त करत आहेत.

 अनेक दिवस मुसळधार पाऊस होत असल्याने दोनदा शेतकऱ्यांनी कांदा रोप टाकले आहे पण दोन्ही वेळेस पावसाने रोप वाया गेले आहे त्याच प्रमाणे बी हे प्रति किलो ३००० रु ने खरेदी करून वाया गेले आहे तसेच वाटाणा वाल तुर मूग आदी शेतमालाचे तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे त्याची नुकसान भरपाई किंवा विमा अद्याप मिळाला नाही त्यामुळे नवीन बी घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही गावरान कांदा बी मार्केट मध्ये अवाजवी दारात मिळत आहे ते शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे शासनाने कांद्याचे बी शेतकऱ्यांना रास्त दरात उपलब्ध करून द्यावे 
---------------
शरद गोरे 
संचालक खादी ग्राम उद्योग 

पारनेर बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याने शंभरी पार केल्यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे जास्त प्रमाणात कल आहे यापूर्वीचे रोपे खराब झाल्यामुळे कांदा बियाण्यांना मागणी वाढली आहे त्यामुळे कांदा बियानेचे दर गगनाला भिडले आहेत तर काही ठिकाणी यामध्ये साठेबाजी करून बियाणे चढ्या भावाने विक्री करण्याचा प्रकार होत आहे.

सध्या कांदा बियाण्यांचा तुटवडा असताना शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू आहे. कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था व नामवंत कंपन्या यांच्याकडे मर्यादित बियाण्यांचा साठा संपलेला आहे. काही विक्रेत्यांनी साठेबाजी करून किमतीपेक्षा अधिक दराने विक्री सुरू आहे. तर, काही जण अधिकृत विक्रेते नसताना बियाणे उपलब्ध असल्याचा दावा करून खुली विक्री करत आहेत. तर काही अधिकृत विक्रेते साठेबाजी करून चढ्या विक्री किमतीपेक्षा अधिक दराने विक्री करत आहेत. कांदा बनावट बियाण्यांची टोळी सक्रीय झाल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला.