Breaking News

पारनेर तालुक्यात आज ३३ अहवाल पॉझिटिव्ह

पारनेर तालुक्यात आज ३३ अहवाल पॉझिटिव्ह


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे आज दि ५ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ३३ व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या ही सतराशे पार झाली आहे यापैकी एकूण ३३ व्यक्तींचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे
तालुक्यामध्ये कोरोना चाचणी चे प्रमाण वाढले आहे तसेच चाचणी जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे माझी जबाबदारी माझे कुटुंब या माध्यमातून देखील प्रत्येक कुटुंबाची तपासणी तालुक्यात केली जात आहे यामुळे गेल्या काही दिवसापासून रुग्ण संख्याही वाढत आहे. 
आज प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालामध्ये पारनेर शहर ४ मावळेवाडी २ जवळा १ रांजणगाव मशीद १ वडनेर हवेली १ वडझिरे १ टाकळी ढोकेश्वर १ भाळवणी १ तराळवाडी १ निघोज १ कान्हूर पठार ५ हंगा १ पिंपरी पठार २ कुंभारवाडी १ सुपा ५ करंदी १ नारायण गव्हाण १ विरोली १ निघोज २ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये समावेश आहे.
तालुक्यातील कान्हुर पठार भाळवणी सुपा टाकळी ढोकेश्वर जवळा पारनेर शहर या भागातही सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.