Breaking News

पारनेर परिवर्तनची गांधीगिरी , रस्त्यातील खड्ड्याजवळ लावले जनजागृती फलक.

पारनेर परिवर्तनची गांधीगिरी , रस्त्यातील खड्ड्याजवळ लावले जनजागृती फलक.
-------------
जनतेची मूलभूत गरज असणारे रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत परिवर्तन चे आंदोलन सुरू राहील.
-------------
भ्रष्ट अधिकारी किंवा जे कुणी या रस्त्यांच्या दुरावस्थेस जबाबदार असतील त्यांची जागा तुरुंगात - सचिन भालेकर 


पारनेर प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची खूप वाईट अवस्था झाली आहे अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत याबाबत परिवर्तन फाऊंडेशने यापूर्वीही आवाज उठवला होता मात्र त्याकडे संबंधित विभागाने अद्याप लक्ष दिले नाही त्या विभागाचे लक्ष वेधण्यासाठी परिवर्तन फाउंडेशन'ने गांधीगिरी मार्गाने रस्त्यावरील खड्ड्यात जवळ जनजागृती फलक लावले आहेत याची चर्चा तालुक्यात होताना दिसत आहेत.


पारनेर तालुक्यातील रस्त्यांची खूप बिकट झाली आहे त्यासंदर्भात पारनेर तालुका परिवर्तन फाउंडेशन सातत्याने रस्ते दुरुस्ती साठी मागणी करत आहे आणि अनेकदा यासाठी आंदोलने देखील केली आहेत.परंतु प्रशासन मात्र याबाबत गंभीर नाही असे दिसून येते म्हणूनच आता अभिनव आणि गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत कुरुंद ते आळकुटी या मार्गावर जवळपास 50 जागृती फलक लावून यावर वाहने सावकाश चालविण्याबाबत संदेश दिला गेला आहे तसेच खड्डे सौजन्य पी डब्लू डी अश्या प्रकारे प्रशासनाला यासाठी जबाबदार धरले आहे .याबाबतचे फलक अचानक सगळीकडे दिसू लागल्याने पारनेर परिवर्तनाच्या या उपक्रमाची चर्चापूर्ण तालुक्यात झाली जोपर्यंत पारनेर तालुका पूर्णतः खड्डेमुक्त होत नाही आणि तालुक्यातील जनतेची मूलभूत गरज असणारे रस्ते चांगले होत नाही तोपर्यंत परिवर्तन चे आंदोलन सुरू राहील ,पुढील काही दिवसात गाढव धिंड,खड्यात सत्यनारायण महापूजा आणि वेळप्रसंगी धरणे आंदोलन परिवर्तन तर्फे केले जाईल. सर्वत्र जे फलक लावले त्यात पारनेर परिवर्तन चे सुकाणू समिती अध्यक्ष सुहास शेळके , अध्यक्ष सचिन भालेकर , पदाधिकारी विकास वाजे,सागर भगत हे स्वतः रात्रभर उपस्थित राहून फलक लावण्याचे काम करत होते.
माझ्यासाठी कोणत्याही राजकीरय पक्षापेक्षा नागरिकांचे जीवन महत्वाचे आहे असे मत सुहास शेळके यांनी यावेळी व्यक्त केले.

 या रस्त्यावर अतिशय भयंकर असे खड्डे पडले असून नागरिकांचा जीव या खड्ड्यांमुळे गमावण्याची वेळ आली आहे ,खड्य्यांचे टेंडर सुद्धा टक्केवारीत अडकल्याची कळते आम्ही अनेकदा याबाबत विनंती केली, निवेदने दिली पण संबंधित अधिकारी हे निर्ढावले आहेत आणि त्यामुळेच यापुढे अशीच अचानक आंदोलने हाती घेतली जातील ,त्याचप्रमाने या सगळ्या रस्त्यांची ऑडिट होणे गरजेचे आहे आणि भ्रष्ट अधिकारी किंवा जे कुणी या दुरावस्थेस जबाबदार असतील त्यांची जागा तुरुंगात आहे -
---------------
सचिन भालेकर 
अध्यक्ष परिवर्तन फाऊंडेशन