Breaking News

तालुक्यातील निघोज व काळेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात तीन हजार रुपयांची दारू जप्त दोघांविरोधात गुन्हा दाखल

तालुक्यातील निघोज व काळेवाडी येथे टाकलेल्या छाप्यात तीन हजार रुपयांची दारू जप्त दोघांविरोधात गुन्हा दाखल


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यांमध्ये काळेवाडी व निघोज टाकलेल्या छाप्यात मध्ये पोलिसांनी विनापरवाना चोरून विक्रीसाठी 3160 रु ची दारू जप्त केली आहे तसेच दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिया स्नॅक्स चे आडोशाला काळेवाडी सावरगाव तालुका पारनेर येथे आरोपी   प्रवीण सखाराम गुंजाळ वय 30 वर्षे राहणार गुळुंचवाडी बेल्हा तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा विनापरवाना बेकायदा 2160 रुपये किमतीची देशी-विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या चोरून विक्री करण्याचे उद्देशाने आपले कब्जात बाळगताना मिळून आला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना निघोज  येथे आरोपी पप्पू गोविंद काळे या.निघोज पारनेर येथे त्याच्या घराच्या आडोशाला विनापरवाना बेकायदा  1000 रुपये किमतीची गावठी हातभट्टी तयार दारू चोरून विक्री करण्याच्या उद्देशाने आपले कब्जात बाळगताना मिळून आला  पंच व प़ोलीसाना पाहून पसार झाला त्याच्याविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक विजय कुमार बोत्रे सो, पोना एस व्ही गुजर , पो.कॉ पाचारणे, पोकॉ चौगुले, होम फुलमाळी यांच्या पथकाने तालुक्यातील दोन ठिकाणी छापे टाकले व त्यात मुद्देमाल जप्त केला आहे.