Breaking News

माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव चा चेहरा-मोहरा बदलला- माजी आमदार विजय औटी

माजी सभापती बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव चा चेहरा-मोहरा बदलला- माजी आमदार विजय औटी
--–-------------
तालुक्याने दोनदा सभापती होण्याचा बहुमान दिलेला आहे  त्याच विश्वासाने पुढील कार्यकाळामध्ये काम करणार- गणेश शेळके
-----------------
अतिवृष्टीच्या निकषामुळे तालुक्यात पळशी वगळता इतर शेतकऱ्यांना मदत नाही त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार विजय औटी यांची माहिती.


पारनेर प्रतिनिधी-
 गोरेगाव नेहमी विकासाच्या कामामध्ये अग्रेसर आहे बाबासाहेब तांबे यांनी गोरेगाव चा चेहरामोहरा बदलला आहे हे अतिशय चांगलं काम बाबासाहेब तांबे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी यावेळी काढले आहे.
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून १५ वा वित्त आयोग निधी मधून जलशुद्धीकरण यंत्र शेळके यांच्या पंचायत समिती सेस मधून बसण्यासाठी बाकडे व ग्रामपंचायत १४ वित्त आयोग निधी मधून सुसज्ज असा कारंजा व रामबाग याचा उद्घाटन सोहळा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके व जि.प.चे  बांधकाम व कृषी सभापती काशिनाथ दाते जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब तांबे सेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले दूध संघाचे चेअरमन राहुल शिंदे तालुका प्रमुख विकास रोहकले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक शेठ कटारिया सुखदेव शेठ पवार नगराध्यक्ष शंकर नगरे  मॉडेल व्हिलेज गोरेगाव च्या सरपंच सुमन ताई तांबे हे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी विजय औटी बोलताना म्हणाले कि  वृद्धांना बसण्यासाठी १४ वित्त आयोग निधी मधून रामबाग विकसित केली त्याचप्रमाणे गावांमध्ये मनोरंजनासाठी उत्कृष्ट आणि सुसज्ज असा कलर कारंजा ग्रामपंचायत १४ वित्त आयोग निधी मधून घेतलेला आहे तालुक्याने नेहमी गोरेगाव चा आदर्श विकासाच्या बाबतीमध्ये डोळ्यासमोर ठेवावा तांबे यांचे अधिकाऱ्यांशी असलेले संबंध याचा उपयोग गोरेगाव च्या विकासासाठी करून घेतला असे यावेळेस विजयराव औटी यांनी सांगितले.
पंचायत समिती सभापती गणेश शेळके म्हणाले १५ वा वित्त आयोग निधी मधून सुसज्ज असा साधे व थंड पाण्याचा जलशुद्धीकरण यंत्र त्यामध्ये एका तासाला जवळपास पाचशे लिटर शुद्ध पाणी गावासाठी मिळणार आहे त्यासाठी गावाने ग्रामपंचायतीने वीस लिटर चे कॅन स्वतःच्या निधीमधून घेतलेले आहे त्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला ते हे पाण्याचे वाटप करणार आहेत तसेच गावामध्ये बसण्यासाठी वीस बाकडे दिलेले आहेत बाबासाहेब तांबे यांनी माझ्याकडे मागणी केली आणि कुठलाही विलंब न करता त्या ठिकाणी मी लगेच जलशुद्धीकरण यंत्र आणि बाकडे बाबासाहेब तांबे यांना गोरेगाव याठिकाणी दिले इथून पुढच्या काळामध्ये तालुक्याला विकासाच्या दृष्टीने पंचायत समितीच्या माध्यमातून जी कामे करता येतील ते कामे नक्कीच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मला तालुक्याने दोनदा सभापती होण्याचा बहुमान दिलेला आहे  त्याच विश्वासाने पुढील कार्यकाळामध्ये काम करणार आहे हे विकासाचे काम होणारच आहे परंतु वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत  लोकांची ची कामे पंचायत समितीच्या माध्यमातून करत आहे माझ्याकडे आलेला माणूस काम होऊनच परत जातो याचा अनुभव माझ्याकडे जे लोक येतात त्यांनी घेतलेला आहे पुढच्या काळामध्ये जनतेसाठीच काम करणार व विकासाच्या दृष्टीने नामदार विजयराव औटी यांच्या मार्गदर्शनाखाली  मी तालुक्यामध्ये काम करणार आहे गेल्या पंधरा वर्षांमध्ये विजयराव औटी यांनी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करणार आहे. असे शेळके यांनी सांगितले.

तालुक्यात पंधरा वर्षांमध्ये विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे या काळात रस्ते जलसंधारणाचे तालुक्यात अनेक कामे करण्यात आली सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकताच शासनाने आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली आहे तालुक्यात त्याचा फारसा फायदा होत नाही पळशी मंडल वगळता इतर ठिकाणी अतिवृष्टीचा निकष असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही तालुक्यात सर्वत्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहे.
----------------------
विजय औटी 
माजी.उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य.