Breaking News

तहसील कार्यालयात गोंधळ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल!

तहसील कार्यालयात गोंधळ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल!
------------
महसूल प्रशासनाचे कोरडे यांना पत्र
---------
माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ कोरडे यांनी तहसील कार्यालयावर गोंधळ घालण्याचा दिला होता इशारा


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुसकान चे पंचनामे करून त्यांना त्वरित नुसकान भरपाई मिळावी तसे न झाल्यास सोमवार दि. 12 रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कचेरीवर शासनाला जाग आणण्यासाठी धरणे तसेच जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी निवेदनाद्वारे दिला त्यावर तहसीलदार यांनी सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती येण्यास मनाई आहे त्यामुळे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ घातल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल अशा प्रकारचे पत्र कोरडे यांना पाठवले आहे.
कोरडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पारनेर तालुक्यातील कोरोना महामारी मुळे शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री वर झालेला परिणाम व त्यामुळे झालेली प्रचंड आर्थिक नुकसान आणि सद्यस्थिती अतिवृष्टीमुळे मूग बाजरी कडधान्ये कांदा ऊस व फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचे तातडीने पंचनामे करावे म्हणून आपण दि.12 रोजी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ करणार आहे मात्र तहसीलदार यांनी कोरडे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की सध्या कोरोना आजारामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केलेली आहे तसेच तालुक्यांमध्ये शासनाच्या निकषानुसार अतिवृष्टी बाधित झालेल्या शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दि. 24 सप्टेंबर रोजी तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना संयुक्तरित्या दिले आहे त्याप्रमाणे त्यांचे काम चालू आहे आपण दि.12 रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व जागरण गोंधळ करू नये कोरोना पार्श्वभूमीवर कलम 144 लागू असल्याने तहसील कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर वर्तन करता येणार नाही आपण सदरचे आदेशाचे पालन करावे त्याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे पत्र तहसीलदार ज्योती देवरे यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे यांना दिले आहे.