Breaking News

पारनेर तालुक्यात काल ९ अहवाल पॉझिटिव्ह, दिलासादायक बाब तालुक्‍यात रुग्णसंख्या मंदावली !

पारनेर तालुक्यात काल ९ अहवाल पॉझिटिव्ह, दिलासादायक बाब तालुक्‍यात रुग्णसंख्या मंदावली !


पारनेर प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या मंदावली आहे दि. १३ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार ९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोझिटिव्ह अहवालांमध्ये पारनेर ३ वाडेगव्हाण १ कान्हूर  पठार २ राळेगण-सिद्धी १ पिंपरी जलसेन १ टाकळीढोकेश्वर १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालामध्ये मध्ये समावेश आहे.
गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे मात्र तालुक्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची चाचणी होताना दिसत नाही त्यामुळे ही संख्या कमी झाली असल्याचे कारण आहे तसेच अनेक संशयित सध्या चाचणीसाठी पुढे येत नाहीत त्यामुळे ही संख्या कमी झाली आहे मात्र लक्षणे दिसत असले तर त्वरित कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.