Breaking News

कचराच्या समस्यामुळे सुपा नागरीकांचे आरोग्य धोक्यात, घाणीचे साम्राज्य वाढतेय प्रशासकासमोर मोठे अव्हान !

कचराच्या समस्यामुळे सुपा नागरीकांचे आरोग्य धोक्यात
----------------
रस्ताच्या कडेला नागरीक करत आहेत कचराचे ढीग
---------------
पर्यायी व्यवस्थेची नागरीकांना प्रतिक्षा
----------------
नवीन वसाहतीकडे दुर्लक्ष, घाणीचे साम्राज्य वाढतेय प्रशासकासमोर मोठे अव्हान


सुपा प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील सुपा हे औदयगिक दृष्टया आणि व्यावसयिक दृष्टया मोठे केंद्र असल्याने दिवसे दिवस या ठिकाणी मोठी गर्दी वाढत चाललेली आहे.
एकीकडे सुपा शहर वाढत आहे ही जरी आनंदाची बाब असली तरी दुसरीकडे स्वच्छते अभावी तसेच विविध सुविधा देण्यास मात्र ग्राम पंचायत व प्रशासन हलगर्जीपणा समोर येत आहेत सध्या सुरू असलेल्या कोरोनाचे महासंकट आहेत त्यातच या ठिकाणी सुपा गावात कचराची मोठी समस्या निर्माण झाली आहे नागरीक रस्ताच्या कडेला कचरा टाकीत आहे.
यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गधी तसेच डासाचा प्रादुर्भाव वाढला आहे सुपा लगतच शहर बाहेरच्या बाजुला वाढत असल्याने नवीन नगरात हीच समस्या आहे लोक गावाबाहेर सत्यालगतच कचराचे ढीग लागलेले आहे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवुन जीव मुठीत धरून नागरीकांना ये जा करावी लागते त्या सोबतच ड्रेनेज लाईनचे देखील व्यवस्थापन होणे गरजेचे आहे शहाजापूर रोड लगत मोठया नाल्याचे पाणी साचल्याने तेथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेले चित्र दिसत आहे कचरा आणि डेनेजचे समस्या नुकतेच आलेले प्रशासक यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
नागरीकांना प्रश्न पडलाय या समस्या प्रशासक सोडलीश काय अशी भावना नागरीक व्यक्त करत आहेत.