Breaking News

सुपा येथे घरगुती गॅस ची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध.

सुपा येथे घरगुती गॅस ची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध.
------------
दसऱ्यानिमित्त या सेवेचा शुभारंभ सुपा परिसरातील ग्राहकांना होणार याचा फायदा.


पारनेर प्रतिनिधी - तालुक्यातील सुपा येथे इंडियन ऑईल कंपनीचे घरगुती ग्राहकांसाठी सायेशा इंण्डेन ग्रामीण वितरक एजन्सीचा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला
सुपा येथे घरगुती गॅस ग्राहकांना सुविधा उपलब्ध झाली असून याचा फायदा सुपा आणि परिसरातील ग्राहकांना होणार आहे अनेक ग्राहकांना गॅस साठी अनेक किलोमीटर अंतर पार करावे लागत होते मात्र या सुविधेमुळे सोपा परिसरामधील ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे यावेळी ग्राहकांना गॅस टाकी रेगुलेटर शेगडीचे वितरण करण्यात आले या प्रसंगी माजी सभापती गंगाराम बेलकर दादासाहेब पठारे राजू औटी लहू भालेकर सुरेश पवार अभय सोमवंशी आदींच्या हस्ते हे वितरण करण्यात आले या सेवेचा परिसरातील ग्राहकांनी लाभ घ्यावा ग्राहकांसाठी येथे सर्वतोपरी च्या सेवा देण्यात येणार आहेत तसेच सुपा परिसरातील १५ किलोमीटरच्या परिसरामध्ये ग्राहकांना या एजन्सीमार्फत घरपोच सुविधा देण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्ज आकारले जाणार नाही अशी माहिती संचालक अनिकेत पठारे यांनी दिली आहे अभिजीत पठारे यांनी सर्व ग्राहकांचे स्वागत केले या वेळी परिसरातील नागरिक व ग्राहक उपस्थित होते.