Breaking News

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री नारायण राणेंना कोरोनाची लागण

 

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यांसुद्धा कोरोनाची लागण होण्याचं सत्र सुरूच आहे. नुकतेचं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे जानवत असल्याने त्यांनी आपली कोरोना चाचणी केली असता त्यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून, डॉक्टरांच्या सल्लानुसार ते विलगीकरणात राहणार आहेत. संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहनसुद्धा राणे यांनी केले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे.

नारायण राणेंनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की,'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईल.' असे ट्विट नारायण राणेंनी केले आहे