Breaking News

कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थितीची सक्ती; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.
-----
मुख्यमंत्री कार्यालयातून दखल ; पत्र संबंधित विभागाला कारवाईसाठी पाठवले काय कारवाई होते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष.


पारनेर प्रतिनिधी-
 शासकीय कार्यालयांमध्ये ५० टक्के हजारीचे आदेश आहेत मात्र पुणे विभागीय मंडळाने या शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे येथे गरज नसतानाही १००% हजरी चे आदेश दिलेले आहेत व अन्य विभागीय मंडळात मात्र ५० टक्के हजरी आहे सध्या दहावी व बारावी चा निकाल लागून बरेच दिवस उलटून गेले कार्यालयात अति महत्त्वाची व तातडीचे काही काम नसून देखील कार्यालयात शंभर टक्के कर्मचारी बोलले जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना एक प्रकारे यासारख्या महामारी खाईत  ढकलले जाण्याचा हा प्रकार असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत असून याबाबत बोर्डाचे कनिष्ठ लिपिक पी. जे  फुंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना व शिक्षण मंत्री यांना याबाबत पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे
      त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी देखील या पत्राची दखल घेतली व पुढील कारवाईसाठी शालेय शिक्षण विभागाचे पत्र पाठवण्यात आले आहे त्यानुसार आता संबंधितावर काय कार्यवाही होती याकडे लक्ष लागले आहे.
याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की आमच्या कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या जीआर ला केराची टोपली दाखवून मनमानी पद्धतीने कारभार चालवला जातो याचे माझ्याकडे लेखी पुरावे आहेत गरज पडल्यास मी ती चौकशी समितीला दाखवू शकतो दि.१२ ऑक्‍टोबर रोजी अर्जित रजेसाठी अर्ज केला असता माझी रजा अमान्य करण्यात आली आहे अमान्य करण्याचे कारण कोरोना असल्याचे नमूद करण्यात आले आहे कार्यालयीन कामकाज करीत आम्हाला वारंवार बाहेर गावी पाठवले गेले आहे कार्यालय मध्ये कायम कर्मचाऱ्यांची गर्दी व अभ्यंगतांची गर्दी असल्यामुळे आज रोजी पर्यंत कर्मचाऱ्यांना कोरोना ची लागण झाली होती सुदैवाने ते ठीक झाले परंतु अशा धोरणांमुळे कोरोनाच्या बाबतीत पुणे देशांमध्ये अव्वल स्थानी पोहोचले आहे सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या महामारी च्या खाईत ढकलल्या पासून वाचवावे ही विनंती या पत्रकात केली होती त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयास पत्र प्राप्त झाल्याची पोहोच मिळाली असून कार्यालयातून हे पत्र कार्यवाहीसाठी शिक्षण विभागात पाठवण्यात आले असल्याची माहिती फुंदे यांना पाठवण्यात आली आहे त्यानुसार संबंधित विभागावर शासन काय कारवाई करते याकडे मंडळातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 कोरोना काळामध्ये कमीत कमी उपस्थित सरकारी कार्यालये सुरू ठेवावे तसेच सध्या ५० टक्के उपस्थितीत कार्यालय सुरू करण्याचे आदेश आहेत मात्र विभागीय मंडळांमध्ये या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना शंभर टक्के उपस्थिती ची सक्ती केली जात आहे कोरोना संख्या वाढू नये याबाबत शासन सर्वतोपरीने उपाययोजना करत आहे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना शासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत घरातून काम करण्याची सुविधादेखील खुली करून देण्यात आली आहे असे असताना काही विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.