Breaking News

कोपरगाव तालुक्यात २१ रुग्णाची वाढ तर २९ कोरोनामुक्त

कोपरगाव तालुक्यात २१  रुग्णाची वाढ तर २९ कोरोनामुक्त
--------
नगर येथे ३६ नमुने पाठवले
--------
तालुक्यात दोन मृत्यू


करंजी प्रतिनिधी- 
आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण २०२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात १८ बाधित तर १८४ अहवाल निगेटीव्ह तर नगर येथील अहवालात २ तर खाजगी लॅब च्या अहवालात १ बाधित आढळून आल्याची  माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर

सुभाष नगर-२
साई नगर-१
गुलमोहोर कॉलनी-१
सब जेल-१


तर ग्रामीण मधील पुढील प्रमाणे 

वारी-३
माहेगाव देशमुख-४
कोळपेवाडी-१
कुंभारी-१
मंजूर-१
रेल्वे स्टेशन-१
साखरवाडी-१
दहेगाव-२
उक्कडगाव-२

असे आज ३ ऑक्टोबर रोजी कोपरगाव तालुक्यात एकूण २१ अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आढळून आले आहे.
   आज रोजी कोपरगाव तालुक्यातील २९ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
आज अखेर कोपरगाव तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या १८९३ तर ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ११३ झाली आहे.

 आज रोजी कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील ६० वर्षीय पुरुषाचा तर कोपरगाव शहरातील ६३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आज  पर्यंत कोपरगाव  तालुक्यातील  एकूण कोरोनामुळे मयत  झालेल्या रुग्णाची संख्या ३५ झाली आहे.