Breaking News

कंगणा राणावतविरुद्ध गुन्हा दाखल करा!

 - वांद्रे कोर्टाचे मुंबई पोलिसांना आदेश

- कंगणाची बहीण रंगोलीविरुद्धही गुन्हा दाखल होणार

मुंबई/ प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान दिले आहेत. मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने हे आदेश दिले आहेत. 

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधातही वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, हिंदू व मुस्लीम या दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य केले होते.  या वक्तव्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात भारतीय दंडविधानाच्या विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत . अभिनेत्री कंगना राणावत ही बॉलिवूडमधील हिंदू आणि मुस्लीम कलाकारांत एक विशिष्ट अंतर निर्माण केले आहे. ती नेहमी काही ना काही आक्षेपार्ह ट्वीट करते. ज्यामुळे केवळ धार्मिक भावनाचे नाही तर चित्रपटसृष्टीतील बरेच लोक यातून दुखावले जातात, असा आरोपही तिच्यावर याचिकेतून केली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने कंगनाविरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश दिले आहेत.