Breaking News

कुळधरणमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू

कुळधरणमध्ये विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू


कर्जत/प्रतिनिधी :
कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी घडली. कावेरी भाऊसाहेब गुंड ( वय : २८) असे मृत महिलेचे नाव आहे.
शेतातील विहिरीवर विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला आहे. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. कर्जत पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.