Breaking News

श्रीगोंदा कारागृहातील ३६ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह !

श्रीगोंदा कारागृहातील ३६ आरोपी कोरोना पॉझिटिव्ह !
---------------
पोलीस प्रशासनात खळबळ !


श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी :
    श्रीगोंदा कारागृहातील ५६ पैकी ३६ कैदी कोरोना पोंझीटिव्ह निघाले असल्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. 
याबाबत अधिक माहिती  अशी, श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख पाहता अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे आज श्रीगोंदा करागृहातील काही आरोपीना स्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे सर्वच कैद्यांची कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला या तपासणीत ५६ पैकी ३६ कैदी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.