Breaking News

पारनेर वन विभागाचे तीन अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात.

पारनेर वन विभागाचे तीन अधिकारी लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात.


पारनेर प्रतिनिधी -
    पारनेर येथील  वनपरिक्षेत्र  कार्यालयांमध्ये  वन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना  लाचलुचपत पथकाने  लाच घेताना  रंगेहात पकडले यामुळे पारनेरमध्ये एकच खळबळ उडाली होती याबाबत  पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने
पारनेरच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयात मोठी कारवाई करीत एकाच वेळी ३ लाचखोरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. नगर ते मुंबई स्मशानभूमीसाठी लाकूड वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर तो सोडण्यासाठी लाच मागून ३० हजारांची रक्कम स्विकारल्याने दोन वनसंरक्षक व एका महिला वनपाल एसीबीच्या जाळ्यात अडकले. राजेंद्र माधवराव जाधव वय .४५ वनसंरक्षक वर्ग -3.श्रीमती पल्लवी सुरेश जगताप वय .३५ वनपाल वर्ग -३ आणि बाळु श्रीधर सुंभे वय. ४२ वनसंरक्षक फिरते पथक वर्ग .३ अशी आरोपीची नावे आहेत. तक्रारदार हे अहमदनगर ते मुंबई स्मशानासाठी लाकुड पुरवठा करतात.त्यांचा लाकडाचा ट्रक कारवाई करणेसाठी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर येथे विभागीय वन अधिकारी दक्षता नाशिक यांनी जमा केला होता. 
      सदर ट्रक सोडणेसाठी आरोपी राजेंद्र जाधव याने ३००००रु. लाचेची मागणी करुन ती दि. ९ रोजी वनपरिक्षेत्र प्रादेशिक कार्यालय पारनेर अ.नगर येथे स्विकारली. आरोपी पल्लवी जगताप यांनी यासाठी रक्कम स्विकारण्यास प्रोत्साहन दिले व आरोपी बाळू सुंभे याने ५०००० रू ची मागणी करून त्यापैकी २५०००रू स्विकारल्याचे मान्य केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आहे.ला.प्र.वि, नाशिकच्या पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, पोनि. उज्ज्वल पाटील, पोनि. किरण रासकर, पोहवा. कुशारे, पोहवा. गोसावी, मोरे, पोना.बाविस्कर, पोना. शिंपी यांच्या पथकाने सुनील कडासने, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, दिनकर पिंगळे पोलीस अधीक्षकनाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक या करीत आहेत.