Breaking News

" नसीबाची चिठ्ठी आली अन " राजश्री सुर्यकांत मोरे सभापती झाल्या

" नसीबाची चिठ्ठी आली अन " राजश्री सुर्यकांत मोरे सभापती झाल्या 


जामखेड प्रतिनिधी :
संपूर्ण जिल्ह्य़ात गाजलेल्या व आठ महिन्यांपासून राजकीय डावपेचात अडकलेल्या जामखेड पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया शेवटी चिठ्ठीद्वारे पार पडली.  सुर्यकांत मोरे यांनी आठ महिने देव पाण्यात ठेवून सभापती पदासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नाला यश आले. नसीबाची चिठ्ठी आली अन् राजश्री सूर्यकांत मोरे यांचे स्वप्न पूर्ण झाले. 
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी तथा पिठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभागृहात सभापती निवडीचा कार्यक्रम झाला.  ३ जूलै रोजी झालेल्या मतदानात भाजपाच्या मनिषा सुरवसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री सूर्यकांत मोरे यांना समान मते पडली होती. आठ महिने देव पाण्यात ठेवून सुर्यकांत मोरे यांनी सभापती पद मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले अन् राजश्री सूर्यकांत मोरे जामखेड पंचायत समितीच्या सभापती झाल्या. आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड मतदार संघाने प्रमुख प्रा मधूकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, प्रा निलेश गायवळ,  उद्योगजक रमेश आजबे अँड हर्षल डोके,  दिपक पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, प्रा राजेंद्र पवार गरसेवक अमित जाधव, डिगांबर चव्हाण, अमोल गिरमे बिलाल शेख आदींनी अभिनंदन केले. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी फटाके फोडून जल्लोष केला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे..