Breaking News

अल्पवयीन मुलगी ३३ आठवड्याची गर्भवती; मुलीवर दोघांनी केले अत्याचार

अल्पवयीन मुलगी ३३ आठवड्याची गर्भवती; मुलीवर दोघांनी केले अत्याचार
-------------
दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात


पारनेर/प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शरीर संबंध ठेऊन त्यानंतर त्या मुलीला त्यातून दिवस गेले याबाबत पोलीस स्टेशनमध्ये मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अत्याचार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१९ चे गणेश उत्सवानंतर ते जुलै २०२० चे दरम्यान वेळोवेळी फिर्यादीच्या वडिलांच्या शेतामध्ये नाग बेंदवाडी भाळवणी तालुका पारनेर येथे आरोपी विषाल भापकर राहणार टाकळी खातगाव तालुका जिल्हा  अहमदनगर संतोष किसन चितळकर राहणार न नागबेंदवाडी भाळवणी तालुका पारनेर पीडित अल्पवयीन मुलगी ही तिचे गावात सप्ताहाला गेली असता आरोपी विषाल भापकर याने पीडित मुलीची ओळख करून तिला वेळोवेळी फोन करून तिचे शेतात भेटून ती अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचा विनयभंग करून तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध केले तसेच यातील आरोपी संतोष चितळकर याने त्याचे कडील मोटरसायकलवर पीडित मुलीस तिचे शाळेत सोडून तिच्याशी ओळख करून तिला वारंवार फोन करून तिला तिचे शेतात बोलावून घेऊन तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध केले दि.१० ऑक्टोबर रोजी तिच्या घरच्यांना मुलीचे पोट वर आलेचे दिसल्याने तिची दवाखान्यात तपासणी करून सोनोग्राफी केली असता सदर अल्पवयीन मुलगी ही ३३ आठवडे ६ दिवसांची गर्भवती असल्याचे समजल्याने त्यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व घटनाक्रम नातेवाईकांना सांगितला व दोन्ही आरोपी विरोधात पीडित मुलीने दि १२रोजी फिर्याद दिल्याने पारनेर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी पद्मने करत आहेत.