Breaking News

निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला अद्याप त्याचा शोध नाही

निघोज कुंडामध्ये रिक्षाचालक पाय घसरून पडला अद्याप त्याचा शोध नाही
---–----------------
पोलीस प्रशासनाकडून शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील निघोज कुंड येथे येथील कुकडी नदीच्या पाण्यामध्ये रिक्षाचालक हात पाय तोंड धुण्यासाठी गेला असता पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये पडला व त्यात वाहून गेला  आहे पारनेर पोलिसांनी काल रात्रीच शोध मोहीम सुरू केली आहे मात्र अद्याप शोध लागलेला नाही.


दि.२० रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास आशा सुरेश जगदाळे ४५ राहणार रांजणगाव गणपती तालुका शिरूर व इतर तीन महिलांसह इसाक रहमान तांबोळी वय ३५ वर्ष यांच्या रिक्षामधून जवळा येथे त्यांच्या मुलीला फराळ घेऊन आल्या होत्या फराळ देऊन परतत असताना या महिला निघोज कुंड येथे दर्शनासाठी थांबल्या त्यावेळी रिक्षा चालक निघोज कुंड येथे हातपाय तोंड धुण्यासाठी गेला असता शेवळ असल्यामुळे तो पाय घसरून तुकडी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जात असताना तेथील लोकांनी पाहिला व आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत तो कुंडात वाहून गेला होता आहे स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत पारनेर पोलीस स्टेशनला माहिती कळवली त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर या परिसरामध्ये तांबोळी याचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


दरम्यान पोलीस निरीक्षक राजेश गवळी उपनिरीक्षक बोत्रे यासह पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तांबोळी याचा त्या परिसरामध्ये शोध घेतला मात्र अद्याप तांबोळी यांचा मृतदेह सापडला नाही कदाचित कुंडातील रांजणखळगे यात अडकण्याची शक्यता आहे किंवा पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो नदीपात्रात वाहून गेला असण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे फायर ब्रिगेड जवानांना पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे तसेच नदीला पूर असल्याने तो ओसरण्याची देखील वाट पाहावी लागणार आहे.