Breaking News

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!

- एम्सच्या डॉक्टरांचा मोठा खुलासानवी दिल्ली/ प्रतिनिधी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा गेल्या तीन महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्‍नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलिस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  डॉक्टरांनी सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असे या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेत सुशांतच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. पण एम्सच्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास केला.  सुशांतच्या गळ्यावर असलेले व्रण आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी, असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले. 14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातील या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असे स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आणि न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयला परवानगी दिली. पण, आता या प्रकरणात एम्सच्या डॉक्टरांनीही सुशांतची हत्या झाली असावी, हे नाकारले आहे.

--------------------