Breaking News

जनतेच्या विचाराधीन व दृष्टीत नसेल असा तालुका घडवायचा आहे : आमदार नीलेश लंके

जनतेच्या विचाराधीन व दृष्टीत नसेल असा तालुका घडवायचा आहे : आमदार नीलेश लंके
---------------
के.के.रेंज चा प्रश्न सुटला आहे तूर्तास कोणी शेतकऱ्यांना संभ्रमात पाडू नये
-----–---------
आमदार निलेश लंके यांची सुजित झावरें वर कडाडून टीका


पारनेर प्रतिनिधी- 
   पारनेर तालुक्यातील सर्वांगीण विकास करण्याचा आपला मानस असून त्या पद्धतीने आपण काम सुरू केले आहे केकेरेंज चा प्रश्न साकळाई योजना राळेगण-सिद्धी व चौदा गाव पाणीपुरवठा आदी प्रश्न मार्गी लागले आहेत पारनेर शहराचा  पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न भविष्यात केला जाणार आहे असे आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की के के रेंज चा प्रश्न मार्गी लावीन असे निवडणुकीपूर्वी सांगितले होते त्या पद्धतीने निवडून आल्यानंतर तो प्रश्न मार्गी लावणे माझे कर्तव्य होते
दरम्यान काही पुढाऱ्यांनी गावागावात जाऊन सांगितलं की हे क्षेत्र संरक्षण खात्याने अधिग्रहित केलेले आहे ते शेतकऱ्यांना द्यावेच लागणार आहे मात्र आपण न्यायालयात जाऊन जे क्षेत्र जाणार आहे त्याचे वाढवू पैसे घेण्याची मागणी करू पण माझे या मतदार संघातील एक इंचही क्षेत्र के के रेंज साठी जाऊन न देण्याचे उद्दिष्ट होते तेथील शेतकरी माझ्याकडे आले होते म्हणाले हे क्षेत्र जाणार आहे पण वाढीव पैसे घेण्यासाठी आपण न्यायालयात जाऊ असे काही लोक सांगतात मी शेतकऱ्यांना सांगितलं तसे काही होणार नाही यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्न करू व मला यासंदर्भात खात्री होती पवार साहेबांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागेल त्याप्रमाणे पवार साहेबांनी संरक्षण मंत्र्यांची बैठक घडवून आणली त्या बैठकीला आम्ही हजर होतो त्या बैठकीत स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून सांगण्यात आल्या व संरक्षण मंत्र्यांनीही ज्यावेळी या ठिकाणी सराव होईल फक्त त्या वेळेस ठराविक भाग हा मोकळा करुन द्यावा असे सांगितले व या ठिकाणी कोणतीही जमीन अधिग्रहित केली जाणार नाही असे संरक्षण मंत्र्यांनी सांगितले या दुसरी समस्या होती ठिकाणी रेड झोन ची त्यामुळे बँकेचे कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होतात यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की वित्त विभागाची बैठक घेऊन बँकेच्या कर्जासंदर्भातील प्रश्न  आपण सोडवू त्यामुळे बँकेचा प्रश्न सुटला तर रेड झोन जाईल असे आमदार लंके यांनी सांगितले.
काहीजण घरामध्ये बसून व्हाट्सअप ला एसेमेस टाकतात रेड झोन च काय मग एवढे दिवस तू काय केले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला के के रेंज संदर्भात एवढ्या दिवस शेतकऱ्यांना वेठीस ठेवले प्रश्न मार्गी लावला नाही आणि आता प्रश्न सुटला तर वेगवेगळ्या चर्चा करून शेतकऱ्यांना संभ्रमात पाडण्याचे काम काही पुढारी करत आहेत.
साकळाई पाणी योजनेचा प्रश्न पण सोडवला आहे यासाठी आपण अभ्यास पूर्व अधिकारी व मंत्र्यांची बैठक घेऊन मांडणी केली राळेगण सिद्धी व 14 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात आला तीसुद्धा योजना लवकरच मार्गी लागणार आहे सुरुवातीला काही लोक म्हणायचे निलेश लंके आमदार झाल्यावर काय करेल पण आता त्यांना अंदाज आला निलेश लंके काहीही करू शकतो आपल्या जनतेच्या विचाराधीन व दृष्टीत नसेल असा तालुका घडवायचा आहे पारनेर शहराचा पाण्याचा प्रश्नही सोडवला जाणार आहे मात्र सध्याचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या अडचणीमुळे तो सोडवता येत नाही कागदपत्रे व इतर बाबी ची पूर्तता त्याच्याकडून होत नाही त्यासाठी त्यांनी मदत करणे गरजेचे आहे आपण या संदर्भात बैठका घेतल्या त्यासाठीचा सर्वे करण्याचे सांगितले मात्र पुन्हा याचा पाठपुरावा नगरपंचायत कडून झाला नाही तरीही तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी  प्रयत्न करणार आहे सध्या माझे नगरपंचायतीत बहुमत नसले तरी काही नगरसेवक व पारनेर ची जनता ही माझी आहे जनतेला पाणी पाजणे हे माझे कर्तव्य आहे येणाऱ्या काळामध्ये नगरपंचायतीची एक हाती सत्ता आपल्या ताब्यात असणार आहे कान्हूर पठार चा पाणी प्रश्न मार्गी लागेल कान्हूर पठार मधील कोणत्याही पुढारी माझ्या सोबत नसेल तेथील जनता सोबत आहे कोणाला वाटत असेल की पतसंस्था बँका ताब्यात असल्यावर राजकारण होते पण निलेश लंके सारखा फकीर माणूसही या तालुक्यात निवडून आला आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
 यावेळी उद्योजक अजय लामखडे राजेंद्र चौधरी दादासाहेब शिंदे ॲड राहुल झावरे डाॅ उदय बर्वे उद्योजक विजय औटी बाळासाहेब खिलारी बापुसाहेब शिर्के अरूण पवार रूग्ण कल्याण समिती अशासकीय सदस्य पत्रकार शरद झावरे अंकुश पायमोडे संतोष ढवळे  शंकर कासुटे दत्तात्रय निवडुंगे सत्यम निमसै संभाजी वाळुंज संदिप चौधरी जालिंदर महाराज वाबळे संदिप गुंजाळ भाऊ चौरे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
  कुत्र्याला चार भाकरी टाकल्या तर कोरोना योद्धा पुरस्कार
जे सोन्याच्या चमच्या घेऊन जन्माला आले त्यांना लोकांचे दुःख काय माहिती आहे मी उपाशी झोपलेलो आहे म्हणून मला लोकांचे दुःख माहित आहे चप्पल पायात नसल्यावर काय दुःख होते उखाडी झोपल्यानंतर झोप येत नाही हे अनुभव मला आहेत त्यामुळे लोकांना ब्लॅंकेट सतरंज्या वाटल्या काहींना काही माहिती नसताना कोविड सेंटर वर टीका केली जाते निवडणुकीच्या वेळेस आम्ही समर्थ आहे राजकारण करायला यावेळेस 61 हजार मतांनी निवडून आलो आहे पुढल्या वेळेस दीड लाख मतदान पार करून निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला व त्यासाठी स्वतः ग्राउंड वर जाऊन काम करावे लागते जाहिरातीसाठी नाही अशा प्रकारची टीका सुजित झावरे यांचे नाव न घेता आमदार निलेश लंके यांनी केली.