Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

- उपचारासाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

मुंबई/ प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  थकवा व अंगात कणकण असल्याने 4 ते 5 दिवस अजित पवार  होम क्वारंटाईन होते.  त्यांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह  आली आहे. परंतु त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. असे अजित पवार यांनी सांगितल.  

अजित पवार म्हणाले, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. दरम्यान, कोरोना काळातदेखील ते सतत कामासाठी बाहेर होते. सतत बैठका आणि मंत्रालयात त्यांची उपस्थिती असायची. अलीकडेच त्यांनी अतिवृष्टग्रस्त भागांचा दौरा केला होता. दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यामुळे त्यांनी सर्व बैठकादेखील रद्द केल्या. अनेक पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. शिवाय, एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशावेळी देखील ते उपस्थित नव्हते. अजित पवार नाराज असल्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत अशी चर्चा रंगली. मात्र या चर्चांना खुद्द शरद पवार यांनी पूर्णविराम दिला होता. अजितदादांच्या कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला कोरोनाची लक्षणे नाहीत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या छातीचा सीटी स्कॅनही करण्यात आला होता. दोन दिवसांआधी खबरदारी म्हणून ही टेस्ट केली होती,  रिपोर्ट हा नॉर्मल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

-----------------