Breaking News

पारनेर बाजार समितीत ६४ रुपये कांद्याला भाव !

पारनेर बाजार समितीत ६४ रुपये कांद्याला भाव.
-------------
कांद्याच्या दरात वाढ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा.
-----------
अतिवृष्टी व लहरी हवामानामुळे तालुक्यातील अनेक हेक्टर कांद्याचे झाले नुकसान.


पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यातील आज झालेल्या कांदा लिलावामध्ये प्रथम क्रमांकाच्या कांद्याला पारनेर बाजार समितीमध्ये ६४ बाजार भाव मिळाला आहे या हंगामातील हा या बाजार समितीत उच्चांकी दर आहे यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र ठराविक शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक असल्याने व नवीन कांदा पावसामुळे खराब झाला असल्याने दरामध्ये वाढ होत असली तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.
दि. १६ रोजी बाजार समितीत २१४८ गोण्यांची आवक झाली होती प्रथम प्रतीच्या कांद्याला ५५०० ते ६४०० द्वितीय प्रतीच्या कांद्याला ३५०० ते५४०० तिसऱ्या प्रतीच्या कांद्याला २५०० ते ३४०० चौथ्या १०० ते २४०० व पाचव्या ५००ते ९०० असा बाजार भाव मिळाला.सध्या कांद्याचा तुटवडा निर्यात बंद असली तरी देशांतर्गत जाणवत आहे त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे देशांतर्गत कांद्याला मागणी वाढल्याने बाजार भावामध्ये वाढ होताना दिसत आहे महाराष्ट्रात नाशिक परिसरामध्ये जास्त प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते मात्र यावर्षी तेथील कांदाही पावसामुळे खराब झाला आहे राज्यातील इतरही भागातील कांद्याचे उत्पादन घटले आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे सध्या बाजारामध्ये जुना कांदा येत आहे या कांद्याला चांगला दर मिळत आहे काही शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा चाळी मध्ये साठवून ठेवला होता त्याने सध्या काजळी पकडली आहे हवामानामुळे तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र त्यातील चांगल्या प्रतीच्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील नवीन लागवड झालेला कांदा अनियमित हवामान व संततधार पावसामुळे खराब झाला आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजारामध्ये कांदा उपलब्ध होणार नाही तसेच जो कांदा उपलब्ध होईल तो कमी प्रमाणात असणार आहे हवामान व पावसामुळे उत्पन्नात मोठी घट निर्माण झाली आहे.

 कांद्याला भाव वाढ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा.
पारनेर बाजार समितीत फक्त दोन हजार च्या दरम्यान कांदा गोणी आवक झाली आवक कमी झाल्यामुळे दर वाढत आहेत मात्र शेतकऱ्याला त्याचा जास्त फायदा मिळत नाही कारण ठराविक शेतकऱ्याकडे कांदा उपलब्ध आहे व नव्याने कांद्याचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना हवामानाच्या लहरीपणामुळे संततधार पावसामुळे कांद्याला रोगराईला सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे त्यातील बरेचसे कांदे खराब झाले आहेत त्यामुळे भाव वाढत असला तरी शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आहे.

 फसवणूक टाळण्यासाठी कांदा बाजार समिती आणून विकावा.
पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला यावर्षीचा उच्चांकी भाव मिळाला आहे शेतकऱ्यांनी आपला साठवून ठेवलेला कांदा टप्प्याटप्प्यांनी विक्रीसाठी आणावा तसेच शेतामध्ये व बांधावर या कांद्याची विक्री केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजार समितीमध्ये आणून विकावा.
प्रशांत गायकवाड 
सभापती बाजार समिती पारनेर