Breaking News

शेतकरी विधेयक व खा.राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा कोपरगाव काँग्रेस कडून निषेध !

शेतकरी विधेयक व खा.राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीचा कोपरगाव काँग्रेस कडून निषेध !


कोपरगाव / ता.प्रतिनिधी 
:महात्मा गांधी यांच्या जयंती चे औचित्य साधत राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं यांनी शिकवलेला अहिंसेचा मार्ग अवलंबत कोपरगाव काँग्रेस कमिटी तर्फे शेतकरी व कामगार विधेयकाला तसेच हसरथ येथील पीडितेला न्याय मिळावा तथा खा.राहुल गांधी  यांना काल झालेल्या धक्का बुक्कीचा निषेध करत तहसीलदार योगेश चन्द्रे यांना निवेदन देऊन तहसील कार्यालय,कोपरगाव येथे धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
 यावेळी  जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोकराव खांबेकर,जिल्हा युवक काँग्रेस महासचिव तुषार पोटे,तालुकाध्यक्ष नितीन शिंदे,शहराध्यक्ष सुनील साळुंके,अल्पसंख्याक जिल्हा सचिव राजुभाई पठाण,अल्पसंख्याक शहराध्यक्ष अब्बासभाई सय्यद,मागासवर्गीय सेल शहराध्यक्ष रविंद्र साबळे,तालुका उपाध्यक्ष विजय जाधव,शब्बीर शेख,शहर सचिव लक्ष्मण फुलकर,चंद्रहार जगताप,चंद्रकांत जगताप,श्री.भगत,यादवराव त्रिभुवन,सचिन होन,रौनक अजमेरे,दादा आवारे विलास नरोडे  व पदाधिकारी सोशल डिस्टनसिंग पाळून उपस्थित होते