Breaking News

'प्रवरे'च्या तुषारांतून घोळले लोणी ! टांगलेल्या शिक्यावर बोक्यांची झडप....

'प्रवरे'च्या तुषारांतून घोळले लोणी ! टांगलेल्या शिक्यावर बोक्यांची झडप....वाचा उद्याच्या अंकात ..

◆ १ ९ २७ चा वनकायदा अद्याप अस्तित्वात आहे बर का!
--------------------
◆ फॉरेस्टच्या जमिनीवर कसे उभे फाऊंडेशन ..?
-----------------
◆ शेषनागाच्या फणीवर नाहीतर महार हाडोळ्यावर उभे केले साम्राज्य.
-------------------
◆ जिल्हाधिकाऱ्यांसह वनाधिकाऱ्यांनाही वाड्यावरचा प्रसाद ..
-------------------
◆ सत्ता तिथे आम्ही ...शेठजींच्या कौतुकांतूनही झाली प्रचिती ..
---------------------

शिक्षणाची कथित पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नगर जिल्ह्यातील कुटीलराजकारणाची राजधानी म्हणजे लोणी प्रवरा. प्रवरेच्या निळ्याशार पाण्याच्या तुषारांनी गोळा झालेले लोणी वरपणाऱ्या बोक्यांचे आवास ..दुसऱ्याच्या आढ्याला टांगलेल्या शिक्यात कायभरले आहे, यावर सतत नजर ठेवून दोन पायावर निवांत पोझ देत, संधी मिळताच झडप घालण्याचा हातखंडा असलेल्या या नगरीतील वाड्यावर थोरल्या साहेबांच्या आत्मचरित्रकथनाचा राष्ट्रीय सोहळा पार पडला. या राष्ट्रीय सोहळ्याला अर्थातच शेठजींची उपस्थिती नसती तर वाड्यावरची शोभा गळून पडली असती. या सोहळ्याच्या निमित्ताने थोरल्या साहेबांच्या म्हणजे आजोबांच्या कर्तृत्वावर शेठजींच्या तोंडून स्तुतिसुमने उधळून घेण्याचे कौशल्य नातवांने यथाशक्ती साधून घेतले...आजोबांचे कर्तृत्व अवघा महाराष्ट्र आणिकाही प्रमाणात देशही जाणतोच. काही उणिवा असल्या तरी आजोबांचे समाजाप्रती असलेले थोडेफार योगदान कुणी नाकारणार नाही, याच भांडवलावर आजवरचा प्रवास सुखकर झाला. पण पुढे काय? या चितेतून बाहेर पडण्याची भन्नाट कल्पना नातवाने अंमलात आणली. थेट शेठजींच्याच तोंडून जुने भांडवल पुनरूज्जीवित करून घेतले. आणखी पाच दहा वर्ष याच भांडवलावर पणजोबा, आजोबांनी उभे केलेल्या साम्राज्यावर नागोबा सारखे बसता येईल. एरवी डिगूदादा आणि स्वतःच्याही कर्तृत्वाच्या मर्यादा नातवाला चांगल्याच ठाऊक आहेत. पणजोबा आजोबांनी उभे केलेल्या साम्राजा वर फणा उभारून फुत्कारणाऱ्या राजकीय जातकुळीचा पर्दाफाश वाचा उद्यापासून दै. लोकमंथन मध्ये................