Breaking News

शाहजापुर येथे जमिनीच्या वादातून दोघांना तलवार व कुर्‍हाडीने बेदम मारहाण

शाहजापुर येथे जमिनीच्या वादातून दोघांना तलवार व कुर्‍हाडीने बेदम मारहाण.
-------------
सुपा पोलिस स्टेशन मध्ये अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील शाहजापुर येथे जमिनीच्या वादातून ११ जणांनी दोघांना तलवार व कुर्‍हाडीने वार करत बेदम मारहाण करून जखमी केले याबाबतची फिर्याद अर्चना विक्रम काळे वय-३० रा.शाहजापुर  ता पारनेर यांनी सुपा पोलिस स्टेशन मध्ये दिली यावरून अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. आठ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास आरोपी रमेश सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले,सावत्या आकल्या भोसले, कैलास निर्वाशा काळे, इनक्या खुट्या काळे,मंगेश इनक्या काळे, सचिन पोपट काळे,अमोल पोपट काळे,सर्व ता.कामरगाव ता.जि.अ.नगर व इतर २ अनोळखी यांनी शाहजापुर येथील फिर्यादीच्या घरासमोर हातात तलवार, कुऱ्हाड ,गज, धारदार शस्र  घेवुन गैर कायद्याची मंडळी जमवुन विक्रम निर्वाशा काळे तुषार पांडुरंग भोसले याना जीवे मारण्याचे उद्देशाने डोक्यात व कमेरेवर वार केले व यातील साक्षीदार शोभा काळे हीस मारहान करुन तिचे गळ्यातील अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंचली जबरदस्ताने तोडुन निघुन गेले आहे यामध्ये विक्रम काळे व तुषार भोसले जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत याबाबत सुपा पोलीस स्टेशनमध्ये अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले करत आहेत.