Breaking News

चंद्रावर अखेर पाणी सापडलेच!

- नासाला 50 वर्षांनी यश


वॉशिंग्टन/वृत्तसंस्था

चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवण्याच्या घटनेला 20 जुलैला 50 वर्षे पूर्ण झाली. मात्र, नुकतेच नासाच्या हाती मोठे यश लागले आहे. चंद्रावर पाणी शोधण्यास नासाच्या संशोधकांना यश आले असून, नुकतीच नासाने याची घोषणा केली. चंद्राच्या सूर्य प्रकाश असलेल्या भागाकडे हे पाणी सापडले आहे. 

नासाने चंद्राच्या नेहमीच सावलीत असलेल्या पृष्ठभागावर शोध घेतला. तेथे 40 हजार चौरस किमीच्या क्षेत्रफळात पाणी असल्याचे आढळले आहे. हे पाणी थंड हवामानामुळे गोठलेले आहे. या जलकणांचा वापर करून चंद्रावरील पुढील मोहिमा राबविता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रावर राहण्यास जाण्याचे अनेक वर्षांपासून मानवाचे स्वप्न आहे. तसेच नासाच्या चंद्रावरील पुढील मोहिमांनाही पाठबळ मिळाले आहे. 2024 मध्ये नाला चंद्राच्या दक्षिणेकडील भागात दोन अंतराळवीर पाठविणार आहे. अनेक दशकांपासून चंद्र हा कोरडा असल्याचे मानले जात होते. मागील संशोधनांमध्ये चंद्रावर पाण्यासारखा पदार्थ सापडला होता. मात्र, हे पाणी एच 2 ओ आणि हायड्रॉक्सिलमध्ये फरक सिद्ध करू शकले नव्हते. तेव्हापासून नासाला आशेचा किरण दिसू लागला होता. नवीन संशोधनात चंद्रावर पाण्याचे कण असल्याचे आढळले आहे आणि रसायनशास्त्राद्वारे ते सिद्धही झाले आहे.