Breaking News

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, हैद्राबादच्या रुग्णालयात दाखल

 


मुंबई : अभिनेत्री तमन्ना भाटियाला  कोरोनाची लागण झाली आहे. या आधी तिने आपल्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. आता तमन्नाचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह   आला आहे. तमन्ना भाटिया   तिच्या आगामी वेब-सीरिजच्या चित्रीकरणासाठी हैदराबादला होती. चित्रीकरणादरम्यान तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती  

तमन्ना भाटियाला पुढील उपचारांसाठी हैदराबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, देशभरातील चाहते सोशल मीडियावर, तिला लवकरात लवकर बरे वाटावे म्हणून शुभेच्छा पाठवत आहेत. या बातमीने तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना धक्का बसला आहे. ट्विटरवर तिच्यासाठी 'गेट वेल सून' संदेशासह सगळे प्रार्थना करीत आहेत.

ऑगस्ट महिन्यात तमन्नाने  ट्विट करत आपल्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी चाह्त्यांसोबत शेअर केली होती. 'माझ्या कुटुंबियांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, खबरदारी म्हणून आम्ही सर्वांनी कोरोना चाचणी केली. आणि या चाचणी दरम्यान माझ्या आई-वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत', असे ट्विट तिने केले होते. त्यावेळी तमन्नासह तिच्या स्टाफ मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, आता चित्रीकरणादरम्यान तमन्नालाही कोरोनाची लागण झाली आहे.