Breaking News

पारनेर तालुक्यात काल १२ अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यातील एकाच गावात ४ कोरोना बाधित रुग्ण

पारनेर तालुक्यात काल १२ अहवाल पॉझिटिव्ह
---------------
तालुक्यातील एकाच गावात ४ कोरोना बाधित रुग्ण.


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील काल दि.२१ रोजी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार तालुक्यातील १२ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे ही तालुक्यासाठी दिलासादायक बाब आहे.
पॉझिटिव्ह अहवालामध्ये देवीभोयरे ४ भांडगाव १ टाकळी ढोकेश्वर २ सुपा १ कान्हूर पठार १ दैठणे गुंजाळ १ ढवळपूरी २ या गावांचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
कोरोना चा संसर्ग सर्वत्र कमी होत आहे देशात राज्यात आणि जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये घट झालेली आहे. तालुक्यात त्याचा परिणाम झाला असून रुग्णसंख्या मंदावली आहे मात्र तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व कोरोना बाबत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन तालुका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.