Breaking News

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

- प्रकृती स्थिर; तातडीने अ‍ॅन्जोप्लास्टीनवी दिल्ली/प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाचे विश्‍वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने  दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अ‍ॅन्जोप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

कपिल देव यांना हार्टअ‍ॅटॅक आल्याचे कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच, त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजणांनी  प्रार्थना केली. कपिल देव यांच्याच नेतृत्त्वात भारतीय क्रिकेट संघाने 1983 मध्ये पहिला वन-डे विश्‍वचषक जिंकला होता. कपिल देव यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्ट आणि 225 वन-डे सामने खेळले आहेत. देव यांनी टेस्टमध्ये 5 हजार 248 धावा केल्या आहेत. तर 434 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तसेच एकदिवसीय कारकिर्दीत त्यांनी 3 हजार 783 धावा केल्या आहेत. तसेच 253 विकेट्सही झटकले आहेत. आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना कपिल देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1994 मध्ये फरीदाबाद येथे खेळला होता.

---------------