Breaking News

मेंढपाळास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसे खुर्द येथील दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल.

मेंढपाळास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी म्हसे खुर्द येथील दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल.
----------
आमच्या गावामध्ये मेंढ्या चारायच्या नाही म्हणून तिला वेळोवेळी मानसिक त्रास


पारनेर प्रतिनिधी - आमच्या गावांमध्ये मेंढ्या चालायला यायचे नाही म्हणून वेळोवेळी शिव्या देऊन मानसिक त्रास दिल्याने परशुराम भालचंद्र काळे यांनी शिंदे मळा म्हसे खुर्द ता पारनेर येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार म्हसे खुर्द येथे दि.२६ जानेवारी ते दि. ११ ऑक्टोबर रोजीचे १६.३०वा. चे दरम्यान गावातील शेतामध्ये चारा चालण्याकरिता घेतलेल्या ठिकाणी म्हसे खुर्द गावातील राहणारे सुभाष मारुती बडे शिवाजी दिनकर मदगे यांना भाचा परसराम लालचंद्र काळे वय पंचवीस वर्ष राहणार म्हसे बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे हा मेंढ्या चारण्यासाठी म्हसे खुर्द गावांमध्ये हे दि.११ ऑक्टोबर रोजी जात असताना त्यात तुम्ही पारदाडांनो आमचे गावात मेंढ्या चारायला यायचे नाही या वरून वेळोवेळी शिव्या देऊन त्यास मानसिक त्रास दिला त्यामुळे त्यांच्या या मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादी चा भाचा परशुराम भालचंद्र काळे याने शिंदे मळा येतील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबतची फिर्याद निवृत्ती भोसले व ३२ वर्ष धंदा मेंढपाळ राहणार म्हसे बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे  यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिली यावरून आरोपी सुभाष मारुती बडे व शिवाजी दिनकर मदगे दोघे राहणार म्हसे खुर्द तालुका पारनेर त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.