Breaking News

IPL 2020 | रहाणेला चेन्नईच्या संघात मिळू शकते संधी !दुबई - यंदाच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. मात्र, स्पर्धेतील एका नव्या नियमाचा त्यांना लाभ घेता येणार आहे. जर दिल्लीने अजिंक्‍य रहाणेला तर, किंग्ज इलेव्हन पंजाबने ख्रिस गेलला संधी दिली नाही तर, या दोन खेळाडूंना चेन्नईच्या संघातून खेळता येणार आहे.

रहाणेला दिल्लीने तर गेलला पंजाबने आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात खेळवलेले नाही. यंदाच्या स्पर्धेतील नव्या नियमानूसार प्रत्येक संघाला खेळाडूंची देवाण-घेवाण करता येणार आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना चेन्नईचा संघ आपल्याकडे घेऊ शकतो.

अर्थात, चेन्नईच्या संघात नियमानुसार ज्या संख्येने परदेशी खेळाडू आहेत ते पाहता त्यांना देशी खेळाडूच आपल्या संघात घ्यावा लागणार असल्याने गेलच्या जागी रहाणेला संधी मिळू शकते.