Breaking News

एनडीए सर्वाधिक 124 जागांवर आघाडीवर!

एनडीएने जिंकल्या 3 जागा
बिहार निवडणुकीचा विजयी निकाल हाती


बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीची  मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आघाडीच्या निकालानंतर आता विजयी निकालाची बातमी समोर आली आहे. एनडीएने  3 जागावर विजय मिळवला आहे. तर जदयूने  एका जागेवर आणि भाजपने 2 जागेवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने  2 जागा जिंकल्या आहेत.

दरभंगातील केवटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकीचा पराभव केला आहे. आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. कुठे महागठबंधन आघाडीवर होते तर कधी एनडीएने आघाडी घेतली होती. पण, दुपारी 12 वाजेनंतर चित्र हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एनडीएने सर्वाधिक 124 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 122 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे.

तर राजद महागठबंधनला 109 जागावर आघाडीवर आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 2 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. एकटा भाजपने सर्वाधिक 71 जागांवर मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 53 जागा आल्या होत्या. तर नितीशकुमार यांच्या जदयूला 71 जागा मिळाल्या होत्या. पण, आता जदयूची घसरगुंडी झाली असून 47 जागांवर आघाडीवर आहे.  त्यामुळे भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्यामुळे नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे तर जदयू 48 जागांवर आघाडीवर आहे. तर व्हीआयपी पक्ष 6 जागांवर आघाडीवर आहे.